US Truck Crash : अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये (Southern California) झालेल्या एका भयानक अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात भारतीय वंशाचा 21 वर्षीय ट्रक चालक जशनप्रीत सिंह (Jashanpreet Singh) याने केला. तो अमेरिकेत अवैधरीत्या (Illegal Immigrant) राहत असल्याचे समोर आले आहे. ट्रक चालवताना जशनप्रीत सिंह हा ड्रग्जच्या नशेत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 

Continues below advertisement

हा अपघात सैन बर्नार्डिनो काउंटी (San Bernardino County) येथील फ्रीवेवर झाला. ट्रकने अनेक गाड्यांना जोरदार धडक दिली आणि त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा अवैधरित्या अमेरिकेत घुसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अवैध स्थलांतरितांसंबंधित कायदे कडक करण्यासंबंधी पावले उचलली जाणार आहेत. 

California Accident : अपघाताचा थरकाप उडवणारा क्षण

जशनप्रीत सिंहचा ट्रक हा भरधाव वेगाने आला आणि त्याने अनेक वाहनांना धडक दिली. ट्रकच्या डॅशकॅममध्ये संपूर्ण घटना कैद झाली असून त्यात ट्रक थेट एका SUV वर आदळताना दिसतो. या धडकेनंतर साखळी अपघाताची (Chain Crash) परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला आणि अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

Continues below advertisement

California Highway Accident : वाहनचालक नशेत, ब्रेकदेखील मारला नाही

कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलचे अधिकारी रोड्रिगो जिमेनेज यांनी सांगितले की, हा अपघात होत असताना जसनप्रीतने ट्रकचा ब्रेकसुद्धा मारला नाही आणि तो ड्रग्सच्या प्रभावाखाली वाहन चालवत होता. वैद्यकीय तपासणीतही हे स्पष्ट झाले की तो अपघाताच्या वेळी नशेत होता. त्यामुळे त्याच्यावर DUI (Driving Under Influence) आणि Vehicular Manslaughter यांसारखे गंभीर आरोप ठेवले गेले आहेत.

Illegal Immigration : अवैध स्थलांतर आणि कारवाई

अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने पुष्टी केली आहे की जसनप्रीत सिंगकडे कोणताही वैध इमिग्रेशन दर्जा नाही. तो 2022 मध्ये दक्षिण सीमेतून (Southern Border) अवैधरित्या अमेरिकेत घुसला होता. त्यानंतर ‘Alternative to Detention’ या धोरणाअंतर्गत त्याला देशाच्या आतील भागात सोडण्यात आले होते. मात्र या अपघातानंतर अमेरिकन इमिग्रेशन आणि कस्टम्स एनफोर्समेंट (US ICE) विभागाने त्याच्याविरुद्ध Immigration Detainer जारी केला आहे.

US Immigration Policy : याआधीही भारतीय चालकांशी संबंधित अपघात

अवैधरीत्या अमेरिकेत आलेल्या भारतीय चालकामुळे असा प्राणघातक अपघात होण्याची ही पहिलीच घटना नाही. ऑगस्ट 2024 मध्ये हरजिंदर सिंग (Harjinder Singh) नावाच्या आणखी एका भारतीय ट्रकचालकाने फ्लोरिडा राज्यातील फोर्ट पिअर्स येथे झालेल्या अपघातात तीन लोकांचा बळी घेतला होता. त्याने देखील 2018 मध्ये अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश करून नंतर कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स (Commercial Driving License CDL) मिळवले होता.

US Visa Policy Review : अमेरिकेत कडक चौकशी आणि व्हिसा पुनरावलोकन

या अपघातानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी ट्रक उद्योगातील परवानग्या आणि परदेशी चालकांची पार्श्वभूमी तपासणी अधिक कठोर करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच विदेशी चालकांसाठी व्हिसा धोरणाचे पुनरावलोकन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हा प्रकार केवळ रस्ते अपघातापुरता मर्यादित नाही, तर तो स्थलांतर धोरण, वाहतूक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय जबाबदारी या तिन्ही स्तरांवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो. जसनप्रीत सिंगचा प्रकरण अमेरिकेत चालू असलेल्या अवैध स्थलांतर आणि वाहतूक नियमपालनावर नवा दबाव आणणार आहे.