एक्स्प्लोर

US Tariff on India: अमेरिकेचा आणखी एक मनमानी फर्मान! रशियाशी व्यापार केल्यास ट्रम्प भारतावर तब्बल 500 टक्के कर लादणार?

India US Trade Deal: अमेरिकेच्या सिनेटमध्ये एक विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे, ज्यात भारत आणि चीनसह रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 500% पर्यंत शुल्क लादले जाऊ शकतं.

India US Trade Deal 2025 : अमेरिकेत एक नवीन वाद निर्माण होऊ शकतो. रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी म्हटले आहे की, अमेरिकन सिनेटमध्ये एक प्रस्तावित विधेयक सादर करण्यात आले आहे, ज्याला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पाठिंबा आहे. या विधेयकानुसार, रशियासोबत व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांवर 500% पर्यंतचे शुल्क लादले जाऊ शकते. यामध्ये भारत आणि चीनचा देखील समावेश आहे.

एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ग्राहम म्हणाले की, "जर तुम्ही रशियाकडून वस्तू खरेदी करत असाल आणि युक्रेनला मदत करत नसाल, तर तुमच्या उत्पादनांवर अमेरिकेत 500% शुल्क आकारले जाईल." त्यांनी आरोप केला की, भारत आणि चीन एकत्रितपणे व्लादिमीर पुतिन यांचे 70% तेल खरेदी करत आहेत आणि हे तेल त्यांचे युद्धयंत्र जिवंत ठेवत आहे.

भारत आणि चीनवर होईल याचा मोठा परिणाम 

हे विधेयक ऑगस्टमध्ये अमेरिकन सिनेटमध्ये मांडले जाऊ शकते. जर हे विधेयक मंजूर झाले तर त्याचा सर्वात मोठा परिणाम रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करणाऱ्या भारत आणि चीनवर होईल. भारत रशियाकडून तेल खरेदी करणारा तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे आणि युक्रेन युद्धाच्या तिसऱ्या वर्षात रशियाकडून सुमारे 49 अब्ज युरो किमतीचे तेल आयात केले आहे. पूर्वी, भारत प्रामुख्याने मध्य पूर्वेकडून तेल आयात करत असे, परंतु फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून, त्यांनी रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे.

'या' सेवांना असेल सर्वधिक धोका

जर अमेरिकेने हे विधेयक मंजूर केले तर त्याचा परिणाम केवळ तेलपुरता मर्यादित राहणार नाही. अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या भारतातील औषधे, वस्त्रोद्योग आणि आयटी सेवांवरही मोठे शुल्क लादले जाऊ शकते. याचा थेट परिणाम भारताच्या निर्यातीवर आणि रोजगारावर होईल.

भारत आणि अमेरिका यांच्यात मोठा व्यापारी करार?

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, भारत आणि अमेरिका यांच्यात एक मोठा व्यापार करार आता जवळजवळ निश्चित झाला आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी मंगळवारी सांगितले की हा करार खूप जवळचा आहे. तथापि, काही मुद्द्यांवर अजूनही वाटाघाटी सुरू आहेत. दरम्यान, भारत आणि अमेरिकेत सुरू असलेल्या चर्चा कृषी उत्पादनांबाबत भारताच्या मागण्यांवर अडकल्या आहेत. वॉशिंग्टनमधील भारतीय शिष्टमंडळ अमेरिकन अधिकाऱ्यांशी यावर चर्चा करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

विशाल देवकर 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Embed widget