Donald Trump: अमेरिकन लष्कराने इराणमध्ये जसा घातक हल्ला केलाय, ते जगातल्या कोणत्याच सैन्याला जमणार नाही: डोनाल्ड ट्रम्प
Donald Trump : अमेरिकेच्या विमानांनी काहीवेळापूर्वीच इराणमधील तीन महत्त्वाच्या अणुकेंद्रांवर हल्ला केला. त्यानंतर देशाला संबोधित करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा देत धमकावले आहे.

Donald Trump Warn Iran: इराण आणि इस्रायलमधील युद्धाला (Israel-Iran conflict) आता नवं वळण लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण इस्रायलमधील संघर्षात आता अमेरिकेनेही (US Strikes on Iran) उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक स्थळांवर हवाई हल्ले केले असून ते पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:दिली आहे. अमेरिकेच्या विमानांनी काहीवेळापूर्वीच इराणमधील तीन महत्त्वाच्या अणुकेंद्रांवर हल्ला केला असून या यशस्वी लष्करी कामगिरीबद्दल मी सर्व अमेरिकी सैनिकांचे अभिनंदन करतो, असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.सोबतच अमेरिकन लष्कराने इराणमध्ये जसा घातक हल्ला केलाय, ते जगातल्या कोणत्याच सैन्याला जमणार नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. (Iran Israel War news)
....तर आठ दिवसात झाला नाही त्याहून कैकपट जास्त नुकसान आम्ही करू
'आम्ही इराणमधील आण्विक स्थळांवर हल्ला केला आणि तो यशस्वी झाला आहे. इराण हा मध्य पूर्वेतील दहशतवाद्यांचा सर्वात मोठा समर्थक असलेला देश आहे. परिणामी आम्ही इराणमधील अतिशय कठीण असे तीन ठिकाण नष्ट केलीत. या लष्करी कारवाई मधील सर्व सैनिकांचे मी अभिनंदन करतो. सोबतच इराणने शांततेची आणि नरमाईची भूमिका घेतली नाही तर गेल्या आठ दिवसात झाला नाही त्याहून कैकपट जास्त अधिक नुकसान आम्ही करू, असा थेट इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या ईशाऱ्यानंतर इराणकडून नेमके काय पावले उचलतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भयानक धोक्याचे उच्चाटन करण्याच्या दिशेने आमचं मोठे पाऊल- डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित करताना आपल्या भाषणात सांगितले की, त्यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत एक मजबूत टीम म्हणून काम केले.त्यांनी दोन्ही देशांमधील सखोल समन्वय आणि रणनीतीची प्रशंसा केली. ट्रम्प म्हणाले, "मी पंतप्रधान नेतन्याहू यांचे आभार मानू इच्छितो आणि त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. आम्ही एका संघासारखे काम केले. दरम्यान, इस्रायलला असलेल्या भयानक धोक्याचे उच्चाटन करण्याच्या दिशेने आम्ही एक मोठे पाऊल उचलले आहे." अशातच आमची विमानं हल्ला करुन सहीसलामत माघारी परतली आहेत. आता शांततेची वेळ आहे, इराणनं युद्ध थांबवावं, अन्याथा मोठं नुकसान होईल, असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
हे ही वाचा
























