Donald Trump praising PM Modi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President of Russia Vladimir Putin) यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्यानंतर, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी पंतप्रधान मोदी आणि भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच व्यापार करार  (Trade Ties) घडवून आणण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला 'चांगला मित्र' असे संबोधले आणि दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांमधील बदलावर प्रकाश टाकभाष्यकेलंय.

Continues below advertisement

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्यानंतर, गुरुवारी (4 जून) ट्रम्प म्हणाले, "वर्षानुवर्षे भारताने अमेरिकेचा गैरफायदा घेतला. त्यांनी आमच्यावर प्रचंड शुल्क लादले आणि त्याबदल्यात आम्हाला काहीही दिले नाही. पण आता परिस्थिती पूर्णपणे उलट झाली आहे आणि आम्ही भारताकडून भरपूर पैसे कमवत आहोत. पण आम्ही निश्चितपणे एका करारावर पोहोचू, कारण मला तुमचे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) आवडतात. ते माझे चांगले मित्र आहेत आणि आमचे संबंध चांगले आहेत. असे ट्रम्प म्हणाले.

अमेरिका आणि भारत व्यापारी कराराच्या अगदी जवळ (US and India Trade Agreement)

Continues below advertisement

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले असतानाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हेवक्तव्य केलं आहे. एका सरकारी निवेदनानुसार, अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींच्या (USTR) चार दिवसीय दौऱ्यामुळे (१-४ जून) द्विपक्षीय व्यापार करारावरील वाटाघाटींना गती मिळाली आहे. दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी बाजारपेठ प्रवेश, गैर-शुल्क अडथळे, सीमाशुल्क प्रक्रिया, व्यापार सुलभता उपाय आणि आर्थिक सुरक्षा सहकार्य यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

President of Russia Vladimir Putin : ....परंतु भारत अशा प्रयत्नांना प्रतिकार करेल, पुतिन यांनीही केली प्रशंसा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी (4 जून) पंतप्रधान मोदी आणि भारताची प्रशंसा केली. यावेळी ते म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमुळे भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांना कोणताही धोका पोहोचत नाही. पुतिन म्हणाले की, अमेरिका रशियासोबतच्या भारताच्या संबंधांवरून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करते, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर असे प्रयत्न निष्प्रभ ठरतात. ते म्हणाले, "अमेरिका रशियासोबतच्या सहकार्यासह अनेक मुद्द्यांवर भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु भारत अशा प्रयत्नांना प्रतिकार करेल." असेहीतेम्हणाले.