Israel US Vs Iran War : आखाती भागातील तणाव आता धोकादायक वळणावर पोहोचला असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणने नाकेबंदी केल्यानंतर ट्रम्प यांनी संतप्त प्रतिक्रिया देत इराणला लक्ष्य केलं. 'मुर्खांनो, होर्मुझ खुलं करा, नाहीतर नरकात जाल' अशा शब्दांत ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून त्यांचा संताप व्यक्त केला आहे.
Hormuz Strait Blockade : इराणची नाकेबंदी, जगभरात खळबळ
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवत फक्त मित्र देशांच्या जहाजांनाच मार्ग देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या सहयोगी देशांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आशिया आणि युरोपमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेक देशांमध्ये तेल संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Trump Warning Iran : ट्रम्प यांचा 10 दिवसांचा अल्टिमेटम
डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच इराणला होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत आता संपत आली असून ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे. वेळ संपत चालली आहे, 48 तासांनंतर अमेरिका कठोर कारवाई करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
US Iran Conflict : अमेरिकेचा हल्ल्याचा इशारा
ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, जर इराणने होर्मुझ खुलं केलं नाही तर अमेरिका इराणच्या पायाभूत सुविधांवर, विशेषतः पॉवर प्लांटवर हल्ला करू शकते. इराणकडून अधिक वेळ मागण्यात आला होता, मात्र त्यानंतरही ठोस निर्णय न झाल्याने अमेरिकेचा संयम सुटल्याचं दिसत आहे.
NATO Reaction : नाटोवर ट्रम्प संतापले
या संकटात मदत न केल्यामुळे ट्रम्प यांनी नाटो देशांवरही टीका केली. त्यांनी नाटोला कागदी वाघ म्हणत अमेरिका नसती तर त्यांचं अस्तित्वच नसतं असा टोला लगावला. तसेच चीनसह इतर देशांनीही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं त्यांनी म्हटलं होतं.
Global Oil Crisis : तेल संकटाची भीती वाढली
होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक मार्गांपैकी एक आहे. इराणच्या नाकेबंदीमुळे पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ यांसारख्या देशांमध्ये तेलटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
ही बातमी वाचा:
