Donald Trump US Iran War: इराण-अमेरिका कराराबाबत (US Iran War) अनिश्चितता कायम आहे. याचदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोशल मीडियावर एआय-निर्मित (AI-generated) फोटो शेअर करून इराणला धमकी दिली आहे, ज्यामध्ये एका लढाऊ विमानाच्या खालच्या बाजूला बॉम्ब लावलेला दिसत आहे. या फोटोसोबत, या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद....असंही लिहिलेलं आहे.
एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात कराराबाबत चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे आज सकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याबाबत किंवा इराण-अमेरिका कराराबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कोणतीही घोषणा झालेली नाही. (Donald Trump US Iran War)
मी वाईट करार करत नाही- डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump US Iran War)
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी 'ट्रुथ सोशल'वरील एका पोस्टमध्ये लिहिले होते, जर मी इराणसोबत करार केला, तर तो चांगला असेल, ओबामांच्या करारासारखा नाही, ज्याने इराणला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिली आणि अणुशस्त्र विकासाचे दरवाजे उघडले. आमचा करार याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, पण तो कोणीही पाहिलेला नाही आणि तो काय आहे हे कोणालाही माहीत नाही. त्यावर अजून पूर्णपणे वाटाघाटीही झालेल्या नाहीत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. तसेच ज्या गोष्टीबद्दल त्यांना काहीच माहिती नाही, त्यावर टीका करणाऱ्या त्या नालायकांचे ऐकू नका. माझ्या आधीच्या लोकांप्रमाणे, ज्यांनी ही समस्या अनेक वर्षांपूर्वीच सोडवायला हवी होती, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तसेच मी वाईट करार करत नाही, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.
अमेरिका-इराण कराराला कशामुळे अडथळा का येतोय? (US Iran War)
इराणच्या तस्निम वृत्तसंस्थेनुसार, या कथित करारामध्ये सर्व आघाड्यांवरील युद्ध संपवण्याचा एक आराखडा समाविष्ट होता, ज्यानुसार वाटाघाटींदरम्यान अमेरिका इराणी तेलावरील निर्बंध शिथिल करणार होती. अल जझीराने सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, अमेरिका करारातील दोन प्रमुख मुद्द्यांवरून माघार घेत असल्याचे संकेत देत आहे. इराणी मालमत्ता गोठवण्याची प्रक्रिया आणि लेबनॉनमधील युद्धविराम. होर्मुझची सामुद्रधुनी आणि इराणचा अणुकार्यक्रम हे देखील वादाचे प्रमुख मुद्दे असल्याचे दिसते.
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरु होणार? (Strait of Hormuz)
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून अमेरिका, इराण आणि त्या भागातील काही देशांसोबत लकवरकच एक करार होईल असं म्हटलं. या करारामध्येच होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरु करण्याचा समावेश असून त्याची लवकरच घोषणा केली जाईल, असंही ट्रम्प यांनी म्हटलं. दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलनं इराणवर 28 फेब्रुवारीला हल्ले सुरु केल्यानंतर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करत अमेरिकेची कोंडी केली होती. होर्मुझमधून विनापरवाना जाणाऱ्या जहाजांवर इराणकडून हल्ले करण्यात आले होते.
