Donald Trump : इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार?
Iran US News Today: अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर काही दिवसात नवा वाद सुरु झाला आहे. अमेरिकेची नजर आता इराणच्या गोठवलेल्या संपत्तीवर असल्यानं संघर्ष पुन्हा वाढू शकतो.

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण इराणच्या गोठवलेल्या संपत्तीचा वापर कुवेत आणि इतर आखाती देशातत युद्धामुळं झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी वापरण्याचा अमेरिकेचा प्लॅन आहे. इराणकडून कुवेत आणि बहरीनवर ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आल्यानं अमेरिकेकडून यावर गांभीर्यानं विचार केला जोत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एका विशेष टीमला इराणकडून आखाती देशात हल्ले झाल्यानं जे नुकसान झालंय त्याचा अभ्यास करण्यास सांगितलं आहे. या टीमकडून आखाती देशातील नुकसानाची भरपाई करण्यासाठी इराणच्या संसाधनांचा वापर करण्याबाबत अभ्यास केला जाऊ शकतो.
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचे सल्लागार मोहसेन रेजाई यांनी तीन महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष संपल्यानं अमेरिकेनं इराणची गोठवलेली 24 अब्ज डॉलरची संपत्ती खुली करण्याची मागणी केली होती.
चर्चा ठप्प, नव्या तणावाची शक्यता
अमेरिकेच्या वित्तमंत्रालयाकडून इराणच्या गोठवलेल्या संपत्तीची कोणत्या प्रकारे चौकशी केली जातेय हे सांगण्यात आलेलं नाही. मात्र, अमेरिकेची इराणची गोठवलेली संपत्ती दुसरीकडे वळवण्याची भूमिका नुकत्याच झालेल्या शस्त्रसंधीच्या भूमिकेला अडचणीची ठरु शकते.पाकिस्तानकडून अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी केली जात असून पाकिस्तानचा एक मंत्री मोजतबा खामेनी यांच्याकडे एक पत्र पोहोचवण्यासाठी तेहरानमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली होती.
अमेरिकेनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत गोरुक आणि केशम बेटांवरील इराणच्या किनारपट्टीच्या ठिकाणांवरील रडारच्या केंद्रांवर हल्ले केले. इराणच्या ड्रोनमुळं जहाजांची सागरी वाहतूक संकटात आल्याचा दावा अमेरिकेनं केला होता. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या आयआरजीसीकडून कुवैत आणि बहरीनमध्ये अमेरिकन शस्त्रतळांवर हल्ले केले होते. कुवेतच्या सैन्यानं 7 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र नष्ट केली होती.
ओपेकनं सलग चौथ्या महिन्यात तेलाच्या उत्पादनाच्या टार्गेटमध्ये वाढ करण्यावर सहमती दर्शवली. युद्धामुळं ओपेकमधील काही देश पूर्णक्षमेतनं उत्पादन करु शकत नसल्याचं देखील समोर आलं आहे. यामुळं जागतिक तेल पुरवठा बाधित झाला आहे. पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. अमेरिका आणि इराण तीन महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
ट्रम्प यांच्यावरील दबावात वाढ
वाढत्या पेट्रोलच्या दरांमुळं आणि महागाईमुळं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील युद्ध संपवण्याचा दबाव वाढतोय. ट्रम्प यांच्यावरील दबाव अमेरिकेकडून वाढलेला आहे. एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांच्याकडील ड्रोन आणि मिसाईल प्लांट नष्ट झाले आहेत. आता इराणकडे केवळ 21-22 टक्के शस्त्र राहिली आहेत.
दरम्यान, लेबनॉन आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष कायम आहे. लेबनॉनची दोन क्षेपणास्त्र पाडण्यात इस्त्रायलला यश आलं तर, इस्त्रायलनं लेबनॉनमध्ये केलेल्या हल्ल्यात दोन अधिकारी आणि एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे.
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ





















