US Iran War Ceasefire : अमेरिका (America) आणि इराण यांच्यातील युद्ध अखेर 40 व्या दिवशी दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीमुळं थांबलं आहे. अमेरिका आणि इराण (Iran) यांच्यातील संघर्ष थांबला असला तरी दोन्ही बाजूनं दावे आणि प्रतिदावे समोर आहेत. अशातच अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी (US Iran War Ceasefire) झाल्यानंतर इस्त्रायलनं मात्र आक्रमक भूमिका कायम ठेवली. इस्त्रायलनं लेबनॉनवर (Attacks on Hezbollah in Lebanon) जोरदार हल्ले केले आहेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं 89 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तर, 700 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. दोन आठवड्याच्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतरही इस्रायलचे लेबनॉनवरील हिजबुल्लाहवर हल्ले सुरूच असल्याचे चित्र आहे. परिणामी मध्यस्थीसाठी पुढाकार घेणाऱ्या पाकिस्तानला (Pakistan) अमेरिकेने तोंडघशी पाडले आहे.
लेबनॉन हा आमच्या शस्त्रसंधीशी संबंधित विषयच नाही, असं म्हणत दोन आठवड्याच्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतरही इस्रायलचे लेबनॉनवरील हिजबुल्लाहवर हल्ले सुरूच असल्याचे चित्र आहे. लेबनॉन शस्त्रसंधीचा भाग नाही असं वक्तव्य अमेरिकेन प्रेस सचिवांनी केलं आहे. त्यामुळे अमेरिकेन शहाबाज शरीफ यांना तोंडघशी पाडले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी शस्त्रसंधीची घोषणा करताना लेबनॉनचा देखील उल्लेख केल्याची माहिती आहे.
Israel Reuven Azar: पाकिस्तान विश्वासार्ह नाही - इस्रायलच्या भारतातील राजदूतांचे वक्तव्य
दुसरीकडे पाकिस्तान विश्वासार्ह नाही, असं महत्वाचं वक्तव्य इस्रायलच्या भारतातील राजदूतांनी केलं आहे.'अमेरिकेकडून स्वतःच्या सुविधेसाठी पाकिस्तानचा उपयोग' असं म्हणत इस्रायलने खडेबोल सुनावले आहे. 'आम्हाला हव्या असलेल्या परिणामासाठी अमेरिकेशी समन्वय महत्वाचा असल्याचेही भारतातील इस्रायलचे राजदूत रेऊवेन अझार म्हणाले आहे.
पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेबाबत, भारतातील इस्रायलचे राजदूत रेऊवेन अझार म्हणाले, 'आम्ही पाकिस्तानला विश्वासार्ह भूमिकेत पाहत नाही. मला वाटते की, युनायटेड स्टेट्सने आपल्या स्वतःच्या कारणांसाठी पाकिस्तानच्या सुविधेच्या सेवांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. भूतकाळात आम्ही पाहिले आहे की, युनायटेड स्टेट्सने कतार आणि तुर्की सारख्या समस्याग्रस्त देशांना कसे वापरले आणि हमासशी करार साध्य करण्यासाठी त्यांचा फायदा घेतला. आमच्यासाठी, आम्हाला हवा असलेल्या परिणामाच्या बाबतीत युनायटेड स्टेट्सशी समन्वय साधून राहणे हे फार महत्वाचे आहे.'
इतर महत्वाच्या बातम्या
