US-Iran Peace Deal: जागतिक राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिका (US) आणि इराण (Iran) यांच्यात ऐतिहासिक शांतता करारावर (Peace Deal) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या दोन्ही महासत्तांमधील तणाव निवळल्याने संपूर्ण जगाने सुटकेचा श्वास सोडला असतानाच, शेजारील देश पाकिस्तान मात्र या कराराचे (Deal) क्रेडिट घेऊन स्वतःचीच वाहवाही करून घेण्यात मग्न झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान (Masoud Pezeshkian) यांनी या करारावर डिजिटल स्वाक्षरी (Digital Sign) केल्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचे पहिले अधिकृत विधान समोर आले आहे.

Continues below advertisement

Shehbaz Sharif: नेमकं काय म्हणाले शाहबाज शरीफ?

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, "मला हे जाहीर करताना अत्यंत अभिमान वाटत आहे की, आज अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक 'इस्लामाबाद सामंजस्य करार' (Islamabad MoU) वर डिजिटल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारावर दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींनी स्वाक्षऱ्या केल्या असून, मध्यस्थ (Mediatior) म्हणून मी देखील याला माझी मंजुरी दिली आहे. दोन्ही सरकारांच्या सर्वोच्च पातळीवर हा करार होणे हे दर्शवते की, दोन्ही पक्ष त्यांचे वाद संवादाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी किती गंभीर आहेत."

Shehbaz Sharif: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्तुतिसुमने 

शाहबाज शरीफ यांनी पुढे सांगितले की, हा 'इस्लामाबाद करार' तातडीने लागू केला जाईल.पहिल्या टप्प्यात इराण तात्काळ 'हॉर्मुज स्ट्रेट' (Strait of Hormuz) सागरी मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला करेल. दुसरा टप्प्यात अमेरिका इराणवर लावलेली सागरी नाकेबंदी त्वरित मागे घेईल.

पाक पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष आभार मानले. ट्रम्प यांच्या शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण चर्चेमुळे संपूर्ण प्रदेशासाठी धोकादायक ठरू शकणारा संघर्ष टळल्याचे शरीफ म्हणाले. यासोबतच त्यांनी जे.डी. वेंस (J.D. Vance), स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांच्यासह अमेरिकन वाटाघाटी टीमच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

Shehbaz Sharif:  इराणचे मानले आभार; जनरल आसिम मुनीर यांनाही दिले क्रेडिट

इराणबाबत बोलताना शाहबाज शरीफ यांनी इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई आणि राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्याप्रती आदर व्यक्त केला. तसेच इराणच्या वाटाघाटी टीममधील मोहम्मद बागेर गालिबाफ, अब्बास अराघची आणि एस्कंदर मोमेनी यांच्या संयमाचे कौतुक केले.

या ऐतिहासिक वळणावर कतार, सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्त या देशांनी दिलेल्या महत्त्वाच्या योगदानाबद्दलही त्यांनी आभार मानले. मात्र, ही डील यशस्वी करण्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या भूमिकेचा विशेष उल्लेख केला. आसिम मुनीर यांच्या कठोर परिश्रमामुळेच या क्षेत्रात शांतता आणि स्थिरता आणणे शक्य झाले, असा दावा शरीफ यांनी केला आहे. हा करार संपूर्ण क्षेत्रात परस्पर आदर आणि समृद्धीचा नवा पाया रचेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा 

US Iran Peace Deal MOU: अमेरिका-इराण करार अखेर पूर्ण, दोन्ही देशांनी सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी, ट्रम्प ओरडून म्हणाले 'It's signed'