US-Iran Deal: इराण आणि अमेरिका (US Iran War) यांच्यातील युद्ध अखेर संपलं आहे. युद्ध संपवण्यासाठीच्या अंतरिम करारावर दोन्ही देशांनी सह्या केल्या. इराणच्या सरकारी वृत्तसंस्था IRNA नुसार, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी सकाळी 6 वाजता करारावर सह्या केल्या.
फ्रान्समधील ऐतिहासिक व्हर्सायच्या राजप्रासादात 14 कलमी करारावर सह्या झाल्या. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या करारानुसार इराणमधील युद्ध समाप्त होईल आणि लेबनॉनमधील संघर्षही संपवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासोबतच होर्मुझ पुन्हा सुरू करणे आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी समाप्त करण्याची चर्चा करण्यात आली आहे. इराणच्या अण्वस्त्रांवर 60 दिवस चर्चा होणार आहे. दरम्यान, इराणसोबतच्या या करारानंतर डोनाल्ड ट्रम्प इराणसमोर झुकल्याची देखील चर्चा रंगली आहे. (US-Iran Deal)
अमेरिका आणि इराण यांच्यातील करारात नेमके काय आहे? (US-Iran Deal Agreement)
या करारानुसार, अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीतील आपली नौदल नाकेबंदी आणि संबंधित निर्बंध उठवण्यास सुरुवात करेल, तर इराण सुरुवातीच्या 60 दिवसांच्या कालावधीसाठी या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची सुरक्षित आणि मुक्त ये-जा सुलभ करेल. या दस्तऐवजात टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवणे, इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणे, इराणच्या तेलाच्या निर्यातीसाठी 'ट्रेझरी वेव्हर्स' (आर्थिक निर्बंधांतून विशेष सवलती) देणे आणि इराणसाठी किमान 300 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा पुनर्बांधणी व आर्थिक विकास कार्यक्रम राबवणे या योजनांची रूपरेषाही मांडण्यात आली आहे. इराणने या सामंजस्य करारात पुष्टी केली आहे की ते अणुशस्त्रांची निर्मिती किंवा संपादन करणार नाहीत. तसेच, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली इराणकडील समृद्ध युरेनियमच्या साठ्याच्या भविष्याबाबत चर्चा करण्याच्या तरतुदींचाही या करारात समावेश आहे.
अमेरिका-इराणमधील करारामध्ये नेमकं काय काय? (US-Iran Deal Agreement)
- लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर युद्धबंदी
- एकमेकांच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ नाही
- 60 दिवस चर्चा करुन करार अंतिम करणार
- अमेरिका होर्मुझमधली नाकेबंदी हटवणार
- इराण होर्मुझमध्ये कसलाही कर घेणार नाही
- इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका 300 अब्ज डॉलर्स देणार
- अमेरिका इराणवरचे सर्व निर्बंध हटवणार
- इराण अण्वस्त्रे बाळगणार नाही
- करार अंतिम होईपर्यंत 'अण्वस्त्रांसंबंधी जैसे थे परिस्थिती
- अमेरिका इराणची गोठवलेली मालमत्ता खुली करणार
- इराणला बॅलेस्टीक क्षेपणास्त्रे ठेवता येणार
