Iran war Live Update: इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक भीषण वळणावर पोहोचला आहे. आज (19 मार्च रोजी) युद्धाचा 20 वा दिवस असून युद्ध अद्याप शिगेला पोहोचल्याचेचित्रआहे. असेअसतानादुसरीकडे पाकिस्तान (Pakistan) अण्वस्त्र मिसाईल बनवण्याच्या तयारीत असल्याचीमाहिती अमेरिकन गुप्तचर संचालकाडूनदेण्यातआलीआहे. तुलसी गबार्ड (Tulsi Gabbard) यांनीयासंदर्भात कबुली दिलीआहे. विशेषबाबम्हणजे, अमेरिकेकडून इतिहासात पहिल्यांदाच अण्वस्त्र कार्यक्रमाच्या (Nuclear Missile) अनुषंगाने पाकिस्तानवर थेट आरोप केलाआहे. पाकिस्तान, इराण , रशिया , चीन, उत्तर कोरिया अमेरिकेला टप्प्यात आणू शकतील, अशी अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणारे क्षेपणास्त्र विकसित करत असल्याची माहिती तुलसी गबार्ड यांचा अमेरिकेच्या सभागृह समितीसमोर जबाबमध्येदिलीआहे.
Tulsi Gabbard : 2035 पर्यंत एकत्रितपणे 16,000 हून अधिक मिसाईलपर्यंत वाढेल
दरम्यान, यासंदर्भातअधिक बोलताना अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की , “गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तान हे अण्वस्त्र आणि पारंपरिक स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अनेक नवीन, प्रगत आणि पारंपरिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण प्रणालींवर संशोधन आणि विकास करत आहेत, जे आपल्या अमेरिकेला त्यांच्या टप्प्यात आणतात. गुप्तचर यंत्रणांचे असे मूल्यांकन आहे की अमेरिकेला असलेला धोका सध्याच्या 3,000 हून अधिक मिसाईल संख्येवरून 2035 पर्यंत एकत्रितपणे 16,000 हून अधिक मिसाईलपर्यंत वाढेल”
त्या पुढे म्हणाल्या की, “पाकिस्तानच्या दीर्घपल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संशोधनात आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा (ICBM) समावेश असू शकतो, जी अमेरिकेवर हल्ला करण्याइतकी क्षमता बाळगतात. गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे की इराणने यापूर्वीच अंतराळ प्रक्षेपण आणि इतर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले आहे, ज्याचा वापर करून इराणने त्यावर संशोधन करण्याचा प्रयत्न केल्यास, 2035 पूर्वी इराण लष्करीदृष्ट्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित करण्यास सुरुवात करू शकतो…“
Tulsi Gabbard : इराणला आपली ड्रोन क्षमता मजबूत करण्यासाठी अनेक वर्षे लागतील
सिनेट समितीसमोर केलेल्या भाषणात, तुलसी गबार्ड यांनी सांगितले की, विविध गुप्तचर माहितीनुसार अमेरिकेवर हल्ला करण्यास सक्षम असलेल्या क्षेपणास्त्रांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येते. त्यांनी सांगितले की, इराणी राजवट अजूनही अबाधित आहे, परंतु अलीकडील अमेरिकेच्या लष्करी कारवायांमुळे ती लक्षणीयरीत्या कमकुवत झाली आहे. त्यांनी सांगितले की, जरी इराणची सध्याची राजवट टिकली, तरी तिला आपली क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता पुन्हा उभारण्यासाठी अनेक वर्षे लागतील.
यापूर्वी तुलसी गबार्ड यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणवर हल्ला करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे (NCTC) प्रमुख जो केंट यांनी निषेध म्हणून राजीनामा दिल्यानंतर हे घडले. युद्धावरून प्रशासनातील हा पहिला उच्चस्तरीय राजीनामा होता. आपल्या निवेदनात, तुलसी गबार्ड म्हणाल्या की, डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन जनतेने प्रचंड बहुमताने राष्ट्राध्यक्ष आणि सरसेनापती म्हणून निवडले आहे.
