US China Scientists Mysterious Deaths : संपूर्ण जगाचं लक्ष लागूनराहीलेल्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध (Iran Israel USA War) अद्यापहीएका निर्णायक टप्प्यावर पोहचलेलंनाही. त्यामुळेजगभरातचिंतेचंवातावरणअसताना दुसरीकडे जगातली दोन महासत्तांमध्ये पडद्यामागे एक अत्यंत भयानक आणि सायलेंट वॉर सुरू असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण जगातील काही आघाडीच्या शास्त्रज्ञांच्या (Scientists) बाबतीत अत्यंत विचित्र घटना घडत असल्याचाप्रकारसमोरआलाआहे. अमेरिकेपाठोपाठ (US) आता चीनमधून (China) गेल्या दोन वर्षांत चीनच्या संरक्षण आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रकल्पाशी संबंधित तब्बल 8 दिग्गज शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने आपल्या 10 अणुशास्त्रज्ञांच्या मृत्यूची चौकशी सुरू केल्याने संपूर्ण जगात खळबळ माजली आहे.

दरम्यान, ज्या ज्या शास्रज्ञांसोबत हे असले प्रकार घडले आहेत त्यांच्यासंदर्भात एक समान धागा आढळून आला आहे. ज्यामध्ये लष्करी तंत्रज्ञानाच्या अत्यंत प्रगत आणि अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये हे सर्व शास्रज्ञ कार्यरत होते. यामध्ये एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, अणुसंशोधन, हायपरसोनिक शस्त्रास्त्रे आणि अंतराळ संरक्षणासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. त्यामुळेच या सर्व घटना अपघात नसून घातपात आहेत का? हा एका मोठ्या कटाचा भाग आहे का? असे एकनाअनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यातही हा सारा केवळ योगायोग आहे की संपूर्ण नियोजन करुन आखलेला प्लॅन आहे? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

Scientists Mysterious Deaths : आधी अमेरिकेचे 10, आताचीनचे 8 शास्त्रज्ञ रहस्यमरित्याठार

'न्यूजवीक' मासिकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2023 ते 2025 या कालावधीत चीनच्या हायपरसोनिक मिसाइल, ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत रसायनशास्त्र प्रकल्पांवर काम करणाऱ्या 8 अव्वल शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला असून, इतरांचा मृत्यू अज्ञात आजार किंवा संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. या मृत्यूंच्या कारणांबाबत चीनने कमालीची गुप्तता पाळली असून, यामुळे यामागे परकीय गुप्तचर यंत्रणांचा हात तर नाही ना? असा संशय बळावला आहे. चीनच्या लष्करी घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या एका संशोधकाने सांगितले की, या प्रकरणातील काही बाबी असामान्य वाटतात, यामध्ये अपघाताची वेळ आणि त्याच्या मृत्यूबाबतचे अधिकृत वर्णन यांचा समावेश आहे.

"फेंग हे तैवानशी संबंधित संभाव्य परिस्थितींच्या (scenarios) एआय (AI) सिम्युलेशन्समागील मुख्य सूत्रधार होते. हा अपघात मध्यरात्रीच्या वेळी घडणे ही अत्यंत विचित्र बाब आहे," असे त्या संशोधकाने म्हटले. त्यांनी अधिकृत अहवालांमध्ये वापरल्या गेलेल्या शब्दरचनेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, रस्ते अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे वर्णन करताना, त्या व्यक्तीने आपल्या प्राणांचे 'बलिदान' दिले आहे, असे सहसा म्हटले जात नाही. ही काही एकमेव किंवा अपवादात्मक घटना नाही. अलिकडच्या वर्षांत, अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या चीनच्या इतरही अनेक शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे.

चेन शुमिंग (५७), मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स तज्ज्ञ- २०१८ मध्ये अशाच एका घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

फेंग यांगहे, लष्करी एआय (AI) तज्ज्ञ- जुलै २०२३ मध्ये एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

झोऊ गुआंगयुआन, रसायनशास्त्रज्ञ- डिसेंबर २०२३ मध्ये अज्ञात कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला.

लिऊ डोंगहाओ, डेटा शास्त्रज्ञ- मार्च २०२४ मध्ये एका अज्ञात अपघातानंतर त्यांचा मृत्यू झाला.

झांग शियाओशिन (६२), अंतराळ तज्ज्ञ- डिसेंबर २०२४ मध्ये एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

झांग दाईबिंग (४७), ड्रोन तज्ज्ञ- जानेवारी २०२५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण उघड करण्यात आलेले नाही.

ली मिनयोंग, बायोमेडिकल रसायनशास्त्रज्ञ- नोव्हेंबर २०२५ मध्ये अचानक उद्भवलेल्या आजारानंतर त्यांचा मृत्यू झाला.

फांग दाईनिंग, हायपरसोनिक्स तज्ज्ञ- फेब्रुवारी २०२६ मध्ये परदेशात असताना उद्भवलेल्या एका वैद्यकीय घटनेनंतर त्यांचा मृत्यू झाला.

यान हाँग, हायपरसोनिक्स संशोधक; मार्च २०२६ मध्ये आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

यातील अनेक शास्त्रज्ञ अशा क्षेत्रांमध्ये कार्यरत होते, ज्यांना धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते- विशेषतः लष्करी एआय (AI), हायपरसोनिक्स आणि प्रगत शस्त्रास्त्र प्रणाली या क्षेत्रांमध्ये प्रमुखपदावरकार्यरतहोते. ही क्षेत्रे प्रामुख्याने हायपरसोनिक्स आणि लष्करी एआय (AI) शी संबंधित आहेत. ज्यामध्ये 'स्वार्मिंग टेक्नॉलॉजी'च्या (swarming technology) सिम्युलेशन्सचाही समावेश होतो. अशा प्रकारच्या तंत्रज्ञान क्षेत्रांतील शास्त्रज्ञांच्या मृत्यूचे प्रमाण काहीसे अधिक असल्याचे दिसून येते," असे त्या संशोधकाने नमूद केले. त्याच वेळी, काही प्रकरणे ही 'केवळ अपघात' असण्याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.