US- Iran Ceasefire: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबतचा युद्धविराम (US- Iran Ceasefire) वाढवला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनुसार हा युद्धविराम वाढवण्यात आला. सध्याचा युद्धविराम संपण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीच, पाकिस्तानच्या विनंतीवरून ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावरून ही माहिती जाहीर केली.

इराणकडून एखादा प्रस्ताव प्राप्त होईपर्यंत, आपण शत्रुत्व थांबवण्याची ही प्रक्रिया (cessation of hostilities) पुढे वाढवत असल्याचे डोनाल्ड स्पष्ट केले. परिणामी, युद्ध तूर्तास टळले आहे आणि मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानला, अमेरिका व इराण यांच्यात चर्चेची नवीन फेरी घडवून आणण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. इराण प्रस्ताव देईपर्यंत आणि दोन्ही देशांची शांतीवार्ता होईपर्यंत हा युद्धविराम असेल असं डोनाल्ड स्पष्ट केलं आहे. मात्र एकीकडे युद्धविरामात वाढ केली असली तरी होर्मुझची नाकेबंदी कायम राहणार आहे. युद्धविराम आणि चर्चेबाबत इराण सरकारमध्ये गंभीर स्वरूपाचे मतभेद आहेत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तिथल्या नेत्यांना एक संधी देण्यासाठी अमेरिकेने हल्ले थांबवले आहेत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले? (US- Iran War)

सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणच्या सरकारमध्ये तीव्र मतभेद आहेत, हे आमच्या लक्षात आले आहे. पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मला युद्धविराम वाढवण्याची विनंती केली होती. इराणचे नेते आणि प्रतिनिधी जोपर्यंत एकमताने एखादा प्रस्ताव सादर करत नाहीत, तोपर्यंत इराणवर हल्ले न करण्याची विनंती आम्हाला करण्यात आली आहे. मी हा युद्धविराम वाढवत आहे. तिथल्या नेत्यांना एक संधी देण्यासाठी अमेरिकेने हल्ले थांबवले आहेत, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. नाकेबंदी (blockade) कायम ठेवावी आणि इतर कोणत्याही संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश मी माझ्या लष्कराला दिले आहेत, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मानले आभार- (Pakistan On US- Iran War)

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटले की, युद्धविराम वाढवण्याची पाकिस्तानची विनंती मान्य केल्याबद्दल आणि त्यामुळे सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांना पुढे नेण्याची संधी दिल्याबद्दल, मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून आभार मानतो. या संघर्षावर वाटाघाटींद्वारे तोडगा काढण्यासाठी पाकिस्तान आपले सर्वतोपरी प्रयत्न सुरूच ठेवेल.

28 फेब्रुवारीपासून इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यात युद्ध- (US- Iran Tension)

अमेरिका आणि इस्रायल यांनी 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ले करून युद्धाची सुरुवात केली होती; हा संघर्ष साधारणपणे सहा आठवडे चालला. अखेरीस, 8 एप्रिल रोजी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम मान्य करण्यात आला. दरम्यान, 11 एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा झाली होती, परंतु ती निष्फळ ठरली. सध्या, हा युद्धविराम पुढे वाढवण्यात आला आहे.

इराण आणि अमेरिकेची शांतीवार्ता धोक्यात?, VIDEO:

संबंधित बातमी:

Trump Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफ म्हणून वसूल केलेले पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु, भारताला फायदा होणार?