एक्स्प्लोर

Ukrainian Drones Hit Russian Airbases : युक्रेनियन अभूतपूर्व ड्रोन स्ट्राईकने पाच रशियन एअरबेस टार्गेट; 80 वर्षांनी जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

Ukrainian Drones Hit Russian Airbases : युक्रेनने आघाडीच्या रेषांमागे हजारो किमी अंतरावर असलेल्या रशियन हवाई तळांवर ड्रोन हल्ल्यात 7 अब्ज डॉलर्स किंमतीची 41 रशियन लष्करी विमाने उद्ध्वस्त केली आहेत.

Ukrainian Drones Hit Russian Airbases : इस्तंबूलमध्ये आज (2 जून) सुरू होणाऱ्या शांतता चर्चेपूर्वी रशियाच्या हद्दीत पायही न ठेवत तब्बल साडे चार हजार किलोमीटरवर असलेल्या अनेक लष्करी हवाई तळांवर ड्रोन हल्ले केल्याने तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की युक्रेनने रविवारी पाच प्रदेशांमधील रशियन लष्करी हवाई तळांना लक्ष्य करून ड्रोन हल्ले केले होते, ज्यामुळे अनेक विमानांना आग लागली. मुर्मन्स्क, इर्कुत्स्क, इव्हानोवो, रियाझान आणि अमूर प्रदेशात हे हल्ले झाले. मुर्मन्स्क आणि इर्कुत्स्क या दोन प्रदेशांव्यतिरिक्त सर्व ठिकाणी हवाई संरक्षण दलांनी हल्ले परतवून लावले, असे मंत्रालयाने म्हटले आहे. “मुर्मन्स्क आणि इर्कुत्स्क प्रदेशात, हवाई तळांच्या जवळ असलेल्या भागातून एफपीव्ही ड्रोन सोडल्याने अनेक विमानांना आग लागली,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.

झेलेन्स्की म्हणाले, दीड वर्षांपासून हल्ल्याची तयारी

आग विझवण्यात आली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. हल्ल्यात सहभागी असलेल्या काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. रविवारी रात्री, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी “एकदम उत्कृष्ट” म्हणत युक्रेनियन ड्रोन हल्ल्याचे कौतुक केले आणि म्हटले की यामुळे मॉस्कोचे मोठं नुकसान झाले आहे. "एक अतिशय उत्तम निकाल आणि युक्रेनने स्वतंत्रपणे दिलेला निकाल," असेही झेलेन्स्की यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर लिहिलं आहे. या कारवाईची तयारी करण्यासाठी दीड वर्षांहून अधिक काळ लागल्याचे त्यांनी नमूद करताना "ही आमची सर्वात लांब पल्ल्याची कारवाई आहे." असेही म्हटले आहे. 

7 अब्ज डॉलर्स किमतीचे रशियन लष्करी विमाने उद्ध्वस्त 

त्यानंतर लगेचच त्यांच्या रात्रीच्या व्हिडिओ भाषणात बोलताना त्यांनी सांगितले की रशियन तळांवर हल्ला करण्यासाठी 117 ड्रोनचा वापर करण्यात आला. "रशियाचे खूप लक्षणीय नुकसान झाले आहे आणि ते योग्यच आहे," असेही ते म्हणाले. युक्रेनच्या सुरक्षा सेवेने (SBU) रविवारी सांगितले की त्यांनी आघाडीच्या रेषांच्या मागे हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या रशियन हवाई तळांवर ड्रोन हल्ल्यांच्या लाटेत एकत्रितपणे 7 अब्ज डॉलर्स किंमतीची रशियन लष्करी विमाने उद्ध्वस्त केली आहे. 7 अब्ज डॉलर्स ही शत्रूच्या धोरणात्मक विमान वाहतुकीची अंदाजे किंमत आहे, जी आज SBU च्या विशेष कारवाईमुळे मारली गेली," असेही एजन्सीने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. युक्रेनियन सीमेपासून सुमारे 4300 किमी अंतरावर असलेल्या इर्कुत्स्कमधील बेलाया एअरबेस आणि युक्रेनपासून सुमारे 1800 किमी अंतरावर असलेल्या दक्षिण मुर्मन्स्कमधील ओलेन्या एअरबेस हे लक्ष्य होते. ट्रकमध्ये लपलेल्या ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली. चार एअरबेसवरील किमान 41 रशियन हेवी बॉम्बर्सना धडक देण्यात आली, असे म्हटले आहे.

दुसरीकडे, रशियन स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, हे ड्रोन एअरबेसजवळील ठिकाणांवरून सोडण्यात आले होते. याचा अर्थ ही एक विस्तृत कारवाई होती. ज्यामध्ये रशियामधील अनेक लोकांचा समावेश होता, असेही बोलले जात आहे. "फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियातील अनेक लष्करी हवाई तळांवर एकाच दिवसात झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे," असे जबारी म्हणाले. गेल्या तीन वर्षांपासून युक्रेनमधील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या हवाई तळांवर रशियाच्या धोरणात्मक हवाई बॉम्बर्स आहेत. 

तिसरे महायुद्ध होण्याची भीती 

दुसरे महायुद्ध संपून 80 वर्षे उलटली आहेत, पण जागतिक शांततेचा पाया पुन्हा डळमळीत झाला आहे. YouGov च्या ताज्या सर्वेक्षणानुसार, अमेरिका आणि युरोपमधील लोकांना पाच ते दहा वर्षांत तिसरे महायुद्ध होण्याची भीती वाटत आहे. रशियासोबतचा वाढता तणाव, अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि अण्वस्त्रांचा धोका ही या भीतीची सर्वात मोठी कारणे मानली जातात. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 55 टक्के लोकांना असे वाटले की आणखी एक जागतिक युद्ध शक्य आहे. त्याच वेळी, 76 टक्के लोकांना असे वाटते की महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर केला जाईल. लोकांना अशीही भीती वाटते की हे दुसऱ्या महायुद्धापेक्षा खूपच विनाशकारी असेल. युरोप आणि अमेरिकेतील लोकांना त्यांचे देश या युद्धात सहभागी होण्याची भीती वाटत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget