Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाला आणखी एक झटका देण्यात आला आहे. रशियाने ताबा मिळवलेल्या लायमन शहरावर पुन्हा एकदा युक्रेनी सैन्यानं ताबा मिळवत पुतिन यांना मोठा दणका दिला आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाला 200 हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. मात्र रशियनं सैन्य युक्रेनमधून माघारी फिरण्यास तयार नाही. युक्रेनियन सैनिक रशियाला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. आता रशियाने ताबा मिळवलेल्या लायमन शहर पुन्हा एकदा युक्रेनच्या ताब्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


लायमन शहरावर पुन्हा युक्रेनचा ताबा


युक्रेनियन सैन्याने शनिवारी रशियन सैन्याच्या ताब्यात असलेलं लायमन शहर आजूबाजचे अनेक महत्त्वाचे भाग पुन्हा ताब्यात घेतले. युक्रेनियन सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात पाच ते सहा हजार रशियन सैनिकांना लायमन शहरातून माघार घ्यावी लागली. रशियन वृत्तसंस्थांनीही यावर शिक्कामोर्तब केला आहे.  लायमन हे डोनेट्स्क प्रांतातील महत्त्वाचं शहरं आहे. लायमन हे युक्रेनचे दुसरे सर्वात मोठं आणि महत्त्वाचं शहर असून वाहतूकीचं केंद्रस्थान आहे. रशियाच्या नियंत्रणातून लायमन सहर परत घेणं हा युक्रेनचा मोठा विजय आहे. दुसरीकडे रशियाने पुन्हा युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत.


पुतिन यांच्याकडून युक्रेनमधील चार प्रांत रशियामध्ये सामील


रशियाने युक्रेनच्या दक्षिणेकडील लुहान्स्क, डोनेट्स्क, जापोरिज्जिया आणि खेरसॉन या चार प्रांतांवर ताबा मिळत ही रशियामध्ये सामील करुन घेतली. यानंतर दुसऱ्याच दिवशी रशियावर झापोरिझिया न्यूक्लियर पॉवर प्लांटच्या महासंचालकांचे अपहरण केल्याचा आरोप युक्रेनकडून करण्यात आला. युक्रेनची अणुऊर्जा पुरवठादार एनरगोटम कंपनीने सांगितले की, रशियन सैन्याने प्लांटचे प्रमुख इहोर मुराशोव्ह यांचे अपहरण केले होते. प्लांटवर रशियन सैन्याचा ताबा आहे. 


रशियन सैन्य लुहान्स्क प्रांतातून पुढे जाण्याचा प्रयत्न


आता लायमन रशियनच्या हातातून गेल्यामुळे, युक्रेनियन सैन्याने लुहान्स्क प्रांतातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पुतिन यांनी लुहान्स्क, डोनेस्तक, झापोरिझ्झ्या आणि खेरसन हे प्रांत रशियामध्ये सामील करुन घेतले. रशियाच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर निषेध होत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, झेलेन्स्की यांनी रात्री उशिरा दिलेल्या भाषणात सांगितले की, 'डोनेस्तक प्रदेशातील लायमन शहर रशियाच्या ताब्यातून सोडवण्यात आलं आहे. पण आपल्या सैनिकांचे यश केवळ लायमन शहरापुरतं मर्यादित नाही.'