मुंबई : आपल्याकडे कुणाचं नशिब कसं पालटेल याचा काही नेम नाही. एका क्षणात कुणीही रंकाचा राव होऊ शकतो, तसेच रावाचा रंकही होऊ शकतो. पैशाचंही तसेच आहे. वर्षानुवर्षे नोकरी करणारा आयुष्यभर नोकरीच करत राहील आणि कुणाचीतरी लॉटरी लागून अचानक तो कोट्यधीश होऊ शकेल. असंच एका व्यक्तीने 200 रुपयांची लॉटरी (Lottery News) काढली आणि त्याला 38 कोटींचे बक्षीस लागले, त्या व्यक्तीचे नशीब रात्रीतून पलटले.
ब्रिटनमधील एका व्यक्तीने केवळ 200 रुपयाची लॉटरी काढली आणि तो मालामाल झाल्याचं दिसून आलं. वास्तविक त्या व्यक्तीने 3.8 दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे 38 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. हा ब्रिटनचा दुसरा सर्वात मोठा लॉटरी जॅकपॉट मानला जातो. कारण याच्या काही दिवसांपूर्वीच आणखी एका व्यक्तीने 5.2 मिलियन पौंड म्हणजेच सुमारे 52 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती. अद्याप या व्यक्तीची ओळख पटली नाही. त्याने अद्याप लॉटरी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला नाही, परंतु लॉटरी कंपनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.
200 रुपयांनी 38 कोटी आणले
मिररच्या रिपोर्टनुसार, ज्या लॉटरीच्या तिकिटावर त्या व्यक्तीने 38 कोटी रुपये जिंकले त्याची किंमत फक्त 2 पौंड म्हणजेच सुमारे 200 रुपये होती आणि त्याच 200 रुपयांनी तो कोट्यवधींचा मालक बनला. लॉटरी कंपनीने सांगितले की, दर आठवड्याला शनिवारी आणि बुधवारी लॉटरी सोडत काढली जाते आणि विजेत्यांची घोषणा केली जाते.
हे लॉटरीचे नियम आहेत
या लॉटरीचा नियम असा आहे की तिकीट खरेदी करणाऱ्यांना 1 ते 59 पर्यंत क्रमांक दिले जातात. त्यापैकी 6 क्रमांक निवडावे लागतात. त्यानंतर जो कोणी तिकिटावरील सर्व 6 आकड्यांशी जुळतो तो भाग्यवान विजेता बनतो आणि एका झटक्यात कोट्यधीश होतो. लाखो लोक या लॉटरीची तिकिटे विकत घेत असले तरी, त्यापैकी काही भाग्यवान लोकच आहेत ज्यांना बंपर लॉटरी लागली.