भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सैन्य कारवाई आणि युद्धजन्य परिस्थिती तुर्की (Turkey) आणि अझरबैजान या दोन देशांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दर्शवल्याने भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारतातील उद्योग, सिनेमा, राजकीय आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी या दोन देशांबद्दल कठोर भूमिका घेत त्यांचा बाजार उठवण्यास सुरुवात केली आहे. देशभरात "बॅन टर्की" चळवळ उभी राहत असून पुण्यात व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंदांवर बहिष्कार टाकून निर्णायक कारवाई केली. स्थानिक आयातीऐवजी इतर व्यापाऱ्यांकडून (Bussiness) खरेदी करणे पसंत करून सामान्य नागरिकदेखील या चळवळीत आपलं योगदान दिलं. तर ट्रॅव्हल्स एजन्सींकडूनही तुर्की देशातील पर्यटनासाठी बुकींग न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे हैदराबादमधील उर्दू विद्यापीठात शिकवणाऱ्या तुर्कस्थानी प्राध्यापकांची घरवापसी करण्यात येत आहे. त्यामुळे, चिमुटभर असलेल्या तुर्की देशाला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळेच, भारत आणि तुर्की यांच्यातील तुलनात्मक माहिती या लेखातून पाहता येईल.
भारत आणि तुर्की या दोन्ही देशांची तुलना करायची झाल्यास भारतापुढे तुर्की देशाचं अस्तित्व तुरळकच म्हणायला हवं. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत तुर्की देशाने भारताविरुद्ध थेट भूमिका घेत पाकिस्तानला मदत केली. पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा जाहीर केल्यामुळे तुर्की देश जगभरात चर्चेत आला असून भारतीय नागरिकांनी देखील तुर्की देशाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियातूनही बायकॉट तुर्कस्तान अशी मोहिमच भारतीयांनी सुरू केली आहे. त्याच, अनुषंगाने दोन्ही देशांची ताकद आणि एकूणच तुलनात्मक परिस्थिती आपण पाहूयात. दरम्यान दोन्ही देशांची लोकसंख्या, लष्कर, भूगोल, मैत्री आणि जागतिक भूमिकांची तुलना खाली दिली आहे.
लोकसंख्या (Population):
भारत: 143 कोटी (60% लोकसंख्या 35 वर्षांखालील)
तुर्की: 8.6 कोटी (बहुसंख्य लोकसंख्या 30 वर्षांखालील)
नागरीकरण: भारत ~36%, तुर्की ~77%
लष्करी ताकद (Military Power):
जागतिक क्रमवारी: भारत (4), तुर्की (11-13)
सक्रिय सैनिक: भारत – 14 लाख, तुर्की – 4.5 लाख
लष्करी बजेट: भारत – $76 अब्ज, तुर्की – $25-30 अब्ज
अण्वस्त्र: भारत – होय (160+), तुर्की – नाही
ड्रोन्स: भारत – SWiFT, Heron; तुर्की – Bayraktar TB2, Akinci
स्वदेशी उत्पादक: भारत – DRDO, HAL; तुर्की – Baykar, ASELSAN
भौगोलिक स्थान (Geography):
भारत: 32.87 लाख चौ.कि.मी., 7 देशांशी सीमा
तुर्की: 7.8 लाख चौ.कि.मी., 8 देशांशी सीमा
भारत: हिंद महासागरात सामरिक ताकद
तुर्की: युरोप-आशिया दुवा
मित्र राष्ट्रे (Allies)
भारत: अमेरिका, फ्रान्स, रशिया, इस्रायल
तुर्की: पाकिस्तान, आजरबैजान, कतार
NATO: भारत – नाही; तुर्की – होय
चीन संबंध: भारत – सावध स्पर्धा; तुर्की – व्यवहार्य संबंध
जागतिक भूमिका
भारत: उगवती महासत्ता, QUAD व BRICS सदस्य
तुर्की: क्षेत्रीय शक्ती, इस्लामी जगतात प्रभाव
हस्तक्षेप: भारत – LOC, डोकलाम; तुर्की – सीरिया, लिबिया
संरक्षण निर्यात: भारत – वाढती; तुर्की – ड्रोन्समध्ये अग्रेसर
नेतृत्व व धोरण:
भारत: संसदीय लोकशाही, नरेंद्र मोदी
तुर्की: राष्ट्रपती प्रणाली, रेसेप तय्यिप एर्दोगान
धोरण: भारत – “Act East”, “Neighbourhood First”तुर्की – “Neo-Ottomanism”, इस्लामी एकात्मता
निष्कर्ष:
भारत – प्रबळ लोकशाही व जागतिक महासत्ता होण्याची क्षमता.तुर्की – क्षेत्रीय प्रभावशाली राष्ट्र, युरोप-आशिया दरम्यान महत्त्वाचे स्थान.