Dalai Lama: तिबेटी बौद्ध धर्म गुरु दलाई लामा लवकरच 90 वर्षांचे होणार आहेत . त्यामुळे त्यांच्यानंतर पंधरावे दलाई लामा कोण होणार ? यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे . इतके दिवस जगणाऱ्या बहुतेकांसाठी 90 वा वाढदिवस हा चिंतनाचा काळ असतो .परंतु जगातील सर्वात मोठ्या बौद्ध भिक्षूंसाठी ओळखल्या जाणाऱ्या तिबेटमध्ये हा एक गंभीर आणि मोठा परिणाम करणारा क्षण असतो . तिबेटी बौद्धांसाठी त्यांचा अध्यात्मिक प्रमुख दलाई लामा निवडण्याची ही प्रक्रिया तब्बल 600 वर्षांपूर्वीपासून सुरू आहे . याच दरम्यान, सध्याचे तेनजीन ग्यात्सो हे 14 वे दलाई लामा यांनी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याच्या निर्णयावरून महत्त्वाचं वक्तव्य केलंय . " माझ्यानंतरचा दलाई लामा हा तिबेटी बौद्ध परंपरेनुसारच निवडला जाईल .यामध्ये चीनचा काहीही संबंध असणार नाही " असं ते म्हणालेत . या वक्तव्यामुळे चीनची चिंता वाढणार असल्याची जगभरात चर्चा आहे .
15 व्या शतकात सुरू झालेल्या दलाई लामा निवडण्याची तिबेटी बौद्ध परंपरा ही आध्यात्मिकतेच्या पलीकडे जाणारी आहे . दलाई लामा निवडणे हा गुंतागुंतीचा भूराजकीय संघर्ष बनत आहे . शतकानुशतके जुनी असणारी ही परंपरा तिबेटचं भविष्य नियंत्रित करते . तिबेटचा दलाई लामा हा चीनच्या पसंतीचा असावा असा दबाव वाढत असताना दलाई लामांनी केलेल्या या वक्तव्यामुळे चीनची झोप उडणार अशी चर्चा आहे .
काय म्हणाले दलाई लामा ?
तिबेटचे 14वे तेनजिन ग्यात्सो हे दलाई लामा येत्या 6 जुलैला 90 वर्षांचे होतील . त्यांच्यानंतर 15 वे दलाई लामा कोण ? याविषयी जगभरातील जाणकारांचे लक्ष लागलेले असताना उत्तर अधिकारी निवडण्याबाबत दलाई लामांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे . ' माझ्यानंतरचा दलाईला माती बेटी बौद्धपरंपरेनुसारच निवडला जाईल .यात चीनचा काहीही संबंध असणार नाही " असं ते म्हणालेत .दलाई लामांनी गादेन फोडरंग ट्रस्टकडे उत्तराधिकारी निवडीची जबाबदारी सोपवली आहे .दलाई लामा ही 600 वर्ष जुन्या संस्थेचे भविष्य काय असेल हेही त्यांनी सांगितलं . ते म्हणाले, " दलाई लामा संस्था भविष्यातही सुरू राहील .त्यांनी 2011 मध्ये दिलेल्या वचनाची आठवण करून दिली .24 सप्टेंबर 2011 रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितलं होतं की ही संस्था चालू ठेवायला हवी .दलाई लामा म्हणाले,'जेव्हा मी जवळपास 90 वर्षांचा होईल तेव्हा मी तिबेटी बौद्ध परंपरेतील वरिष्ठ लामा, तिबेटी लोक, आणि धर्म पाळणारे इतरांची सल्लामसलत करून दलाई लामा संस्था चालू ठेवायची का याबाबत हा निर्णय घेईन . "
दलाई लामा परंपरा नेमकी काय ?
दलाई लामा परंपरा ही 15 व्या शतकात सुरू झालेल्या तिबेटिक बौद्ध धर्माशी संबंधित आहे .ही परंपरा पुनर्जन्मावर आधारित आहे .ज्यामध्ये प्रत्येक दलाई लामा हा मागच्या लामाचा पुनर्जन्म मानला जातो . पारंपरिकपणे दलाई लामांच्या पुनर्जन्माचा शोध हा सध्याच्या दलाई लामांच्या मृत्यूनंतर सुरू होतो . वरिष्ठ भिक्षू चिन्हांचा अर्थ लावतात .दैवज्ञांचा सल्ला घेतात .पूर्वीच्या दलाईलामांचे गुण साधर्मी असणाऱ्या मुलासाठी तिबेटी प्रदेशांमध्ये शोध घेतात .या प्रक्रियेला वर्षानुवर्ष लागू शकतात .ज्यामुळे अनेकदा अध्यात्मिक नेतृत्वाची पोकळी निर्माण होते .
दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनसाठी का महत्त्वाचा ?
दलाई लामा हे तिबेटच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे .जागतिक स्तरावर तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वात मोठे नेते हे दलाई लामा असतात . 1950 मध्ये तिबेटवर कब्जा करणारा चीन दलाई लामांना 'लंगडा भिक्षू ' असं संबोधत लामांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असला तरी तिबेटि लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे . दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवून चीन तिबेटी बौद्ध धर्म आणि तिबेटी लोकांवर आपली पकड मजबूत करू इच्छितो .दीर्घकाळापासून बीजिंग असा आग्रह धरते की तिबेटिलामांच्या पुनर्जन्माला मान्यता देण्याचा अधिकार केवळ त्यांच्याकडे आहे . चीनने या आधीच स्वतःचे पंचेन लामा, तिबेटी बौद्ध धर्मातील दुसरे सर्वोच्च अध्यात्मिक नेते आणि पुढील दलाई लामा ओळखण्यात एक प्रमुख व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहेत .
लामांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनचे अनेक प्रयत्न
तिबेटी बौद्ध धर्म आणि लामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनने याआधीही अनेक प्रयत्न केले आहेत . 2095 मध्ये चौदाव्या दलाई लामा यांनी निवडलेल्या 6 वर्षीय गेधुन चोएकी न्यिमाला अकराव वे पंचनामा म्हणून मान्यता देण्यात आली .त्यानंतर तीनच दिवसांनी त्याच्या कुटुंबाचे अपहरण केले .आणि त्याच्याजागी ग्यालस्सेन नोर्बू यांना नियुक्त केले .या व्यक्तीला तिबेटी लोक ओळखत नसल्याचा सांगितलं जातं . अपहरण केलेला गेधून चोएकी गेल्या 30 वर्षांपासून बेपत्ता आहे .
हेही वाचा: