Thailand Cambodia border clash: थायलंडने कंबोडियन लष्करी तळांवर हवाई हल्ले सुरू केले असून दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष पेटलाय . CNNच्या वृत्तानुसार, कंबोडियाच्या सीमेवर संघर्ष सुरू होताच थायलंडच्या सुरीन प्रांतातील रहिवासी आश्रयासाठी पळाले .यात अनेक महिला लहान मुलांचा समावेश आहे . अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मंदिराच्या व सीमेवरचा वादांमुळे या दोन्ही देशांमध्ये तीव्र मतभेद आहेत . हा नक्की वाद काय ? सध्या धुमसणाऱ्या युद्धाचं मूळ नेमकं कुठं? जाणून घेऊया सविस्तर..
थायलंड कंबोडिया यांच्यात नेमका वाद काय ?
थायलंड आणि कंबोडिया यांच्यात 800 kmच्या सीमेवरून अनेक वर्षांपासून वाद आहे .आता या सीमेवरून झालेल्या संघर्षात जवळजवळ एक डझनभर थाई सैनिकांचा मृत्यू झालाय .तर एक नागरिक जखमी झाल्यानंतर मोठा संघर्ष उफाळलाय . कंबोडियातील लष्करी लक्षांवर हल्ला करण्यासाठी थायलंडने अनेक लढाऊ विमाने देखील तैनात केली आहेत .
आग्नेय आशियात असणाऱ्या या दोन्ही देशांमध्ये सीमा वादाची सुरुवात सन 1900 च्या दशकाच्या सुरुवातीपासून होते . यावेळी कंबोडियावर फ्रान्सचे राज्य होते .थायलंड या काळात सियाम म्हणून ओळखले जात होते .तेव्हा ते स्वतंत्र राष्ट्र होते . 1907 मध्ये फ्रेंच ने थायलंड आणि कंबोडिया मधील सीमारेषा निश्चित केली .मात्र यावर थायलंडने आक्षेप घेतला .दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा जपानने हा प्रदेश ताब्यात घेतला .आणि या युद्धा दरम्यान थायलंडने या प्रदेशांवर पुन्हा नियंत्रण मिळवले . तथापि,जपानने अमेरिकेसमोर शरणागती पत्करल्यानंतर या प्रदेशांचे नियंत्रण पुन्हा एकदा कंबोडियाकडे आले. पुढील अनेक दशके या दोन्ही देशांचा सीमावाद यावरून आहे. जरी या दोन्ही देशांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले असले तरी यातून फारसे काहीही साध्य झालेले नाही हे स्पष्ट होते .आता या सगळ्यात मंदिराची मालकी हा एक गुंतागुंतीचा विषय आहे . सध्या ज्या मंदिरामुळे थायलंडने कंबोडियावर हवाई हल्ले केले त्यामागे असणाऱ्या मंदिराचा नेमका वाद काय ?
मंदिराच्या मालकीची गुंतागुंत
या दोन्ही देशांमध्ये मंदिराच्या मालकीवरूनही बराच संघर्ष होतोय .थायलंड मधील प्रेह विहार किंवा खाओ फ्रा विहारन नावाचे अकराव्या शतकातील हिंदू मंदिर दोन्ही देशांमधील वादविवादाचा विषय राहिला आहे . 1962 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हे मंदिर कंबोडियाला बहाल केले .मात्र थायलंडने आजूबाजूच्या जमिनीवर दावा करणे सुरूच ठेवले होते .2003 मध्ये कंबोडियाच्या जागतिक वारसासूचीबद्ध अंगकोर वाट मंदिराच्या अधिकारक्षेत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या एका थाई सेलिब्रिटीच्या कथित टिप्पणीवरून काही दंगलखोरांनी नोम प्रेहमधील थाई व्यवसायांना जाळून टाकले .या वादग्रस्त भागात येणारी इतर काही मंदिरे म्हणजे ता मोआन थॉम आणि ता मुएन थॉम .
2008 मध्ये कंबोडियाने प्रेह विहार मंदिराला युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध करण्याचा प्रयत्न केला .यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला .यामुळे अनेक वर्ष या भागात चकमकी होत होत्या .अनेकांचे मृत्यू झाले .यामध्ये 2011 मध्ये आठवडाभर चाललेल्या तोफखान्यांच्या देवाण-घेवाणींचाही समावेश आहे .यात हजारो नागरिक बेघर झाले .अनेकांचे मृत्यू झाले . प्रेह विहेअर मंदिराच्या मालकीवरून या दोन्ही देशांमध्ये तीव्र मतभेद आहेत .2008 आणि 2011 मध्ये अशाच प्रकारचे रक्तरंजित संघर्ष या भागात घडले होते .गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये तणाव सातत्याने वाढतोय .
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय, अन् पुन्हा संघर्ष
2013 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पुन्हा एकदा आपला निर्णय देत मंदिराभोवतीची जमीन ही कंबोडियाचाच भाग असल्याचे सांगितलं होतं . तसेच या भागातून थाई सैन्याला माघार घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते . थायलंडने या निर्णयावर नाराजी व्यक्त करत दोघांमधील कोणतेही परस्परविरोधी सीमा दावे हे द्विपक्षीय यंत्रणेद्वारे सोडवले पाहिजेत असं म्हटलं होतं .
दरम्यान कंबोडिया ने ते प्रकरण संपला असून या विषयावर थायलंडशी संवाद साधण्यास नकार दिला आणि फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील तणाव पेटला .यावेळी कंबोडियन सैन्य आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी वादग्रस्त भागातील एका सीमेवरील प्राचीन मंदिरात प्रवेश केला .त्या मंदिरात कंबोडियन राष्ट्रगीत गायले .ज्यामुळे थाई सैन्य आणि कंबोडियन सैन्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला .
हेही वाचा