Taliban Pakistan War: अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर पलटवार; हल्ल्यात 58 पाकिस्तानी सैनिक ठार, तालिबानचा दावा
Taliban Pakistan War: हेलमंड, पक्तिया, खोस्त आणि नांगरहारमध्ये पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यात तीव्र चकमकी झाल्याचे वृत्त आहे. या भागात तणाव वेगाने वाढत आहे आणि सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे.

Taliban Pakistan War: काबूलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर, अफगाणिस्तान सैन्याने डुरंड रेषेवरील (पाकिस्तान-अफगाण सीमा) पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला (Taliban Pakistan War) केला आहे. या हल्ल्यात एकूण 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबानने केला आहे. हेलमंड, पक्तिया, खोस्त आणि नांगरहारमध्ये पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यात तीव्र चकमकी झाल्याचे वृत्त आहे. या भागात तणाव वेगाने वाढत आहे आणि सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे.
🚨 BREAKING: Taliban’s Zabihullah Mujahid reports 58 Pakistani soldiers killed 30 injured in fierce Durand Line clash last night. 9 Taliban casualties operation paused at Qatar & Saudi’s behest.
— Ashufrancis25 (@ashufranci875) October 12, 2025
Afghanistan🇦🇫 and Pakistan War hangs in balance! #Taliban #Pakistan #Afghanistan pic.twitter.com/cHCMyGv0GG
د پاکستان پوځ کې ځانګړې کړۍ د لویو قوتونو د خوشحاله کولو لپاره په سیمه کې جګړې ته لمن وهي
— Hurriyat Radio Pashto (@HurriyatPa) October 12, 2025
د اسلامي امارت ویاند مولوي ذبیح الله مجاهد وایي، نړۍ باید د پاکستان خاوره کې د شریرو ډلو او کړیو پر وړاندې اقدام وکړي.
یوټیوب لېنک: https://t.co/a7Wyg7CDkj pic.twitter.com/F2XKdCt30Y
तालिबानने नेमकं काय म्हटलंय? (Taliban Pakistan War)
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी राजधानी काबूलमध्ये पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप केला. पाकिस्तानने आयएसआयएसला त्यांच्या वायव्य प्रांत खैबर पख्तुनख्वामध्ये कॅम्प स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानला त्यांच्या हद्दीत दहशतवादी घटकांना आश्रय देणे थांबवण्याचे आणि त्यांना काबूल सरकारच्या स्वाधीन करण्याचे आवाहन केले.
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला तालिबानचे प्रत्युत्तर- (Taliban response to Pakistan's airstrikes)
9 ऑक्टोबरला रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूल आणि पक्तिका प्रांतांवर हवाई हल्ले केल्यानं दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. पाकिस्तानने केलेल्या या हवाई हल्ल्यात काबूल आणि पक्तिका येथील एक संपूर्ण नागरी बाजारपेठ आणि 35 निवासी घरे उद्ध्वस्त केली. यानंतर काबूल आणि पक्तिका येथे झालेल्या हल्ल्यांचे परिणाम आता भोगावे लागतील, असा इशारा अफगाणिस्तानकडून देण्यात आला होता. त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी रात्री अफगाणिस्तानकडून पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला.



















