Taliban New Government: तालिबान्यांनी मंगळवारी काळजीवाहू सरकारच्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. तालिबानची निर्णय घेणारी शक्तिशाली संस्था 'रहबारी शूरा'चे प्रमुख मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांची अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुल्ला अब्दुल गनी बरदार, जे घोषणेपूर्वी बराच काळ चर्चेत होते, त्यांना उपपंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.


इराणच्या धर्तीवर तालिबानने सरकार स्थापन केले आहे. जिथे तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हेबतुल्लाह अखुंदजादा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता असेल. सरकारच्या मंत्र्यांच्या नावांची घोषणा करताना तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, सरकार चालवण्यासाठी ही तात्पुरती व्यवस्था केली जात आहे.


Taliban Government Update : अफगाणिस्तानचं नवं सरकार! मुल्ला हसन अखुंद नवे पंतप्रधान तर सिराजुद्दीन हक्कानी गृहमंत्री


मुल्ला हसन सध्या तालिबानची शक्तिशाली निर्णय घेणारी संस्था, रहबारी शूरा या नेतृत्व परिषदचे प्रमुख आहेत, जे गटाच्या सर्व बाबींवर सरकारी मंत्रिमंडळासारखे काम करते, जे शीर्ष नेत्याच्या मान्यतेच्या अधीन असते. हसन अखुंद हे धार्मिक विद्वान मानले जातात आणि त्यांनी पाकिस्तानात शिक्षण घेतले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) प्रतिबंधित यादीत हसन अखुंद यांचे नावही आहे.


अहवालानुसार, मुल्ला हसन तालिबानचे सुरुवातीचे ठिकाण कंदहारचे असून तालिबानच्या संस्थापकांपैकी एक आहे. त्यांनी 20 वर्षे 'रहबारी शूरा'चे प्रमुख म्हणून काम केले आणि मुल्ला हेबतुल्लाह यांचे जवळचे मानले जातात. 1996 ते 2001 पर्यंत अफगाणिस्तानमधील मागील तालिबान सरकारच्या काळात त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून काम केले आहे.


तालिबानचे संस्थापक मुल्ला मोहम्मद उमर यांचे पुत्र मुल्ला याकूब यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याकूब हा मुल्ला हेबतुल्लाचा विद्यार्थी होता, ज्याने यापूर्वी त्याला तालिबानच्या शक्तिशाली लष्करी आयोगाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले होते.



अफगाणिस्तानचे गृहमंत्री  आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत


काबुलच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हक्कानी नेटवर्कचा सिराजुद्दीन हक्कानी हा तालिबान सरकारचा नवी गृहमंत्री असणार आहे तर तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा याकुब हा संरक्षण मंत्री असणार आहे. अफगाणिस्तानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी  आंतरराष्ट्र्चीय दहशतवाद्यांच्या यादीत आहे. अमेरिकेने हक्कानी विषयी माहिती देणाऱ्यास 50 लाख डॉलरचे बक्षीस देखील जाहीर केली आहे. अमेरिकेच्या एफबीआयच्या वेबसाईटनुसार 2008 साली अफगाण राष्ट्रपती हामिद करजईंच्या हत्येच्या कटात  हक्कानी देखील सहभागी होता.