Kalpana Chawla : तारीख 1 फेब्रुवारी 2003, ठिकाण- टेक्सास, यूएसए.  नासाचे अंतराळयान कोलंबिया शटल STS-107 वेगाने पृथ्वीच्या दिशेने परतत होते. भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला याच वाहनातून दुसरी अंतराळ मोहीम पूर्ण करून परतत होत्या. पृथ्वीपासून सुमारे 2 लाख फूट दूर असलेल्या या वाहनाचा वेग ताशी 20 हजार किलोमीटर होता. पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 16 मिनिटे लागणार होती, पण अचानक नासाचा या यानाशी संपर्क तुटला. अंतराळ यानात मोठा स्फोट झाला आणि त्याचे रूपांतर आगीच्या गोळ्यात झाले. कोलंबिया शटल स्पेस व्हेईकल क्रॅश झाल्याची बातमी आली, कल्पना चावलासह सर्व 7 अंतराळवीरांचा मृत्यू झाला.

22 वर्षांपूर्वी त्या दिवशी काय घडलं होतं?

16 दिवसांची मोहीम यशस्वी होण्यापूर्वी 16 मिनिटात अयशस्वी झाली होता. आज सुनीता विल्यम्स यांच्या सुखरूप परतल्यामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र 2003 मध्ये अशाच एका मिशनच्या अपयशाने संपूर्ण देशाचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. कल्पना चावला यांनी 19 नोव्हेंबर 1997 रोजी पहिल्यांदा अंतराळात झेपावले. पहिल्या अंतराळ प्रवासात त्या 372 तास अंतराळात राहिल्या. त्यानंतर 16 जानेवारी 2003 रोजी त्यांना दुसऱ्यांदा अंतराळात जाण्याची संधी मिळाली.

अन् सर्व अंतराळवीरांचा मृत्यू 

कल्पना चावला 1 फेब्रुवारी 2003 रोजी पृथ्वीवर सुखरूप परतणार होत्या, परंतु त्यांची मोहीम अयशस्वी झाली. कल्पना चावला यांच्या अंतराळयानाच्या टेकऑफच्या वेळी, वाहनाच्या इंधन टाकीतून बाहेर पडणारे इन्सुलेट फोमचे तुकडे शटलच्या डाव्या पंखावर आदळले. यामुळे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना प्रखर उष्णतेपासून अंतराळयानाचे संरक्षण करणाऱ्या टाइल्सचे नुकसान झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे कल्पना चावला यांचे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात पोहोचताच हवेच्या जोरदार घर्षणाच्या उष्णतेमुळे मोठा स्फोट झाला आणि सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला.

कल्पना यांची एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये पीएच.डी  

कल्पना चावला यांचा जन्म 1 जुलै 1962 रोजी हरियाणातील कर्नाल येथे झाला. त्या चार भावंडांमध्ये सर्वात लहान होत्या. कल्पनाला लहानपणापासूनच विमान आणि उड्डाणाच्या दुनियेत रस होता. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कर्नाल येथे झाले. त्यानंतर पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. केले. अमेरिकेतून एरोस्पेस इंजिनीअरिंगची पदवी घेतलेली कल्पना 1982 मध्ये अमेरिकेला गेल्या. त्यांनी 1984 मध्ये टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. 1986 मध्ये त्यांनी त्याच विषयावर दुसरी पदव्युत्तर पदवी आणि नंतर पीएचडी केली. कल्पना चावला यांनी 1983 मध्ये फ्रान्सच्या जॉन पियरेशी लग्न केले. ते व्यवसायाने फ्लाइंग इन्स्ट्रक्टर होते.

वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी जीव गमवावा लागला

1997 मध्ये त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या. कल्पना चावला यांना 1991 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आणि त्याच वर्षी त्यांनी नासामध्ये प्रवेश घेतला. 1997 मध्ये, अंतराळात जाण्यासाठी त्यांची नासाच्या स्पेशल शटल प्रोग्राममध्ये निवड झाली. कल्पना चावला यांची पहिली अंतराळ मोहीम कोलंबिया स्पेस शटल (STS-87) द्वारे 19 नोव्हेंबर 1997 रोजी सुरू झाली. यासह ती अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला ठरली. त्यावेळी कल्पना 35 वर्षांची होत्या. आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेवर, चावला यांनी 65 लाख मैलांपेक्षा जास्त अंतर कापले आणि 376 तासांपेक्षा जास्त (15 दिवस आणि 16 तास) अंतराळात घालवले. कल्पना चावला यांचा हा शेवटचा यशस्वी अंतराळ प्रवास ठरला. 16 जानेवारी 2003 रोजी कल्पना चावला त्यांच्या आयुष्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या अंतराळ मोहिमेचा एक भाग बनल्या होत्या.

मेकअप आणि फॅशनपासून दूर

कल्पना चावला नेहमीच टॉम बॉय राहिल्या. लहानपणापासूनच त्यांना लहान केस ठेवण्याची आवड होती. मेकअप आणि फॅशनशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. जेव्हा त्यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न होते तेव्हा त्यानी तीन दिवस तोच ड्रेस घातला होता. जेव्हा विचारण्यात आले की ती कपडे का बदलत नाही आहे, तेव्हा ती म्हणाली की हे आवश्यक नाही. हे फक्त वेळ वाया घालवतात.