एक्स्प्लोर

युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार

Spanish PM Pedro Sanchez on Netanyahu : युरोपियन युनियनने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत. अशा गुन्हेगारी कृत्यांना शिक्षा व्हायलाच हवी," असेही सांचेझ यांनी स्पष्ट केले.

Spanish PM Pedro Sanchez on Netanyahu: स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर लेबनॉनमधील सुरू असलेल्या लष्करी कारवाईवरून सडकून प्रहार केला आहे. नेतन्याहू यांचे "मानवी आयुष्य आणि आंतरराष्ट्रीय कायद्याबद्दलचे दुर्लक्ष आता असहाय्य झाले आहे," असे सांचेझ यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात जो तात्पुरता युद्धविराम (Ceasefire) झाला आहे, त्यामध्ये लेबनॉनचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी सांचेझ यांनी केली. इस्रायलकडून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनाचा जगाने निषेध करावा, असे त्यांनी सांगितले. "युरोपियन युनियनने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार (Association Agreement) तातडीने स्थगित करावेत. अशा गुन्हेगारी कृत्यांना शिक्षा व्हायलाच हवी," असेही सांचेझ यांनी स्पष्ट केले.

जीवन आणि आंतरराष्ट्रीय कायद्याबद्दलचा अनादर असह्य 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांनीही लेबनॉनचा या करारात समावेश नसल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेने हिजबुल्ला विरोधातील इस्रायलच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे. सांचेझ म्हणाले की, नेतान्याहू यांचा “जीवन आणि आंतरराष्ट्रीय कायद्याबद्दलचा अनादर असह्य आहे” आणि अमेरिका व इराण यांच्यातील युद्धविराम करारात लेबनॉनचा समावेश करण्याची मागणी केली. सांचेझ यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला इस्रायली पंतप्रधानांनी केलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनाचा निषेध करण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान, ब्रिटनने सुद्धा मेरिका व इराण यांच्यातील युद्धविराम करारात लेबनॉनचा समावेश करण्याची मागणी केली आहे. 

गुन्हेगारी कृत्यांसाठी कोणालाही सूट मिळता कामा नये

"नेतान्याहू यांनी आक्रमण सुरू झाल्यापासून लेबनॉनवर सर्वात कठोर हल्ला चढवला आहे. त्यांचा जीवन आणि आंतरराष्ट्रीय कायद्याबद्दलचा अनादर असह्य आहे. आता स्पष्टपणे बोलण्याची वेळ आली आहे: लेबनॉनचा युद्धविरामात समावेश झालाच पाहिजे. आंतरराष्ट्रीय समुदायाने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या या नव्या उल्लंघनाचा निषेध केला पाहिजे. युरोपियन युनियनने इस्रायलसोबतचा आपला असोसिएशन करार निलंबित केला पाहिजे. आणि या गुन्हेगारी कृत्यांसाठी कोणालाही सूट मिळता कामा नये," असे स्पॅनिश पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 

इस्रायल जाणीवपूर्वक युद्धविरामात अडथळे आणत आहे

दरम्यान, इराणने आरोप केला आहे की, इस्रायल जाणीवपूर्वक या युद्धविरामात अडथळे आणत आहे. लेबनॉनवर जर असेच हल्ले सुरू राहिले, तर हा करार मोडीत निघू शकतो आणि 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) परिसरात पुन्हा तणाव निर्माण होऊ शकतो, असा इशारा इराणने दिला आहे. दुसरीकडे, अमेरिकेने मात्र लेबनॉनला या युद्धविरामात समाविष्ट करण्यास नकार दिला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लीविट यांनी स्पष्ट केले की, "हा युद्धविराम लेबनॉनसाठी नाही आणि हे सर्व संबंधित पक्षांना कळवण्यात आले आहे."

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
US-Iran War Ceasefire: अमेरिका-इराण युद्धविराम, शहबाज शरीफांचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, 'असीम मुनीर आमचे हिरो, अल्लाहने पाकिस्तानला...'
अमेरिका-इराण युद्धविराम, शहबाज शरीफांचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, 'असीम मुनीर आमचे हिरो, अल्लाहने पाकिस्तानला...'
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?

Israel Attack Lebanon: इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले, 254 नागरिकांचा मृत्यू, 1165 जण जखमी; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद, शस्त्रसंधीच्या पहिल्या दिवशी काय काय घडलं?
इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले, 254 नागरिकांचा मृत्यू, 1165 जण जखमी; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद, शस्त्रसंधीच्या पहिल्या दिवशी काय काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
Satara ZP Election : राष्ट्रवादी ऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान, पक्षाचा व्हिप मोडला, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळेंविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु
लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळे अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपात्रतेची कारवाई सुरु
Harshwardhan Sapkal On Baramati By Election 2026: बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सपकाळांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
पतीला न्याय मिळेपर्यंत निवडणुकीपासून दूर राहावं, अश्विनी देशमुखांविरुद्ध उमेदवारी अर्ज भरताच सल्ला
Shubman Gill: अवघ्या एका धावेनं जिंकल्यानंतरही गुजरात टायटन्सला बीसीसीआयचा दणका; कॅप्टन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला
अवघ्या एका धावेनं जिंकल्यानंतरही गुजरात टायटन्सला बीसीसीआयचा दणका; कॅप्टन गिलला लाखो रुपयांचा दंड ठोठावला
बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
Suresh Dhas: बीडमध्ये व्यासपीठावर एकत्र बसले, गप्पाही मारले; कार्यक्रमानंतर म्हणाले, धस-मुंडे संघर्ष संपलेला नाही
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकार गंभीर, सखोल तपास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
Washington Sundar: गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये, पण पहिल्या आयपीएल फिफ्टीसाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा! तब्बल चार टीममध्ये नशीब आजमावल्यानंतर अखेर स्वप्न साकार
गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये, पण पहिल्या आयपीएल फिफ्टीसाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा! तब्बल चार टीममध्ये नशीब आजमावल्यानंतर अखेर स्वप्न साकार
Embed widget