क्रिमिया रशियाकडे राहणार, याला बराक ओबामा कारणीभूत, झेलेंस्कींमुळं लाखो लोकांचा मृत्यू, ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया यूक्रेन युद्ध संपण्याच्या दिशेनं असल्याचं म्हटलं. क्रिमिया रशियाकडेच राहील असंही ते म्हाले.

Russia Ukraine War न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रशिया यूक्रेन युद्धावर भाष्य केलं. क्रिमिया रशियाकडे राहील, असं ट्रम्प म्हणाले. त्यांनी यासाठी यूक्रेनमध्ये युद्ध संपवण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरु झाल्याचं म्हटलं.
रशिया यूक्रेन युद्धावरुन ट्रम्प यांनी राष्ट्रपती वोलोदिमीर झेनेंस्की यांच्यावर ट्रम्प यांनी टीका केली. हे युद्ध सुरु होण्यास झेलेंस्की जबाबदार आहेत. लाखो लोकांच्या मृत्यूसाठी देखील तेच दोषी आहेत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. रशियासोबतचा वाद मिटवण्यासाठी क्रिमिया त्यांना देण्यास झेलेंस्की यांनी नकार दिल्यानं ट्रम्प यांनी जोरदार टीका केली.
हे बराक ओबामा यांच्यामुळं झालं
वृत्तसंस्था AP च्या रिपोर्टनुसार जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं गेलं की यूक्रेन क्रिमिया पत मिळवू शकेल का त्यावेळी उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की क्रिमियामध्ये पहिल्यापासून रशियन पाणबुड्या होत्या. क्रिमियातील अनेक लोक रशियन भाषा बोलतात. हे बराक ओबामा यांच्यामुळं झालं आहे. क्रिमिया ट्रम्प यांनी देऊन टाकला नव्हता, असंही ते म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की झेलेंस्की यांना चांगलंच माहिती आहे की क्रिमिया भविष्यात रशियाच्या नियंत्रणात राहिल. कारण ही बाब सर्वजण जाणतात की क्रिमिया बऱ्याच काळापासून रशियाकडे आहे.
यूक्रेनच्या नाटोतील समावेशावर ट्रम्प काय म्हणाले?
यूक्रेनच्या नाटोमधील समावेशावर देखील ट्रम्प यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की भविष्यात अमेरिकेच्या नेतृत्त्वातील सैन्य आघाडी असलेल्या नाटोमध्ये यूक्रेन सहभागी होईल. त्यांनी म्हटलं की यूक्रेनला नाटोत सहभागी व्हायचं असल्यानं युद्ध सुरु झालं. ते एक महत्त्वाचं कारण होतं. या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की यूक्रेन कधी नाटोचा सदस्य होईल असं वाटत नाही.
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु होण्याचं कारण यूक्रेननं नाटोमध्ये सहभागी होण्याबाबतच्या चर्चा सुरु करणं हे होतं. ही गोष्ट जाहीरपणे मांडली गेली नसती तर हे युद्ध सुरु होऊ शकलं नसतं, असं ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध 24 फेब्रुवारी 2022 ला सुरु झालं होतं. तेव्हापासून रशिया आणि यूक्रेन यांच्याकडून परस्परांवर हल्ले सुरु आहेत.
इतर बातम्या :

























