Russia Ukraine Crisis Effect on India : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) या दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरुच आहे. या युद्धाला आता सहा महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला आहे. मात्र परिस्थिती निवळण्याची चिन्हं दिसत नाहीत. या युद्धाचा परिणाम आता भारतावर होण्याची शक्यता आहे. येत्या काळात भारतामध्ये ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. जगभरात ऊर्जेचे संकट गडद होत चाललं आहे.


रशिया-युक्रेन संघर्षामुळे येणाऱ्या काळात खाद्यतेल, घरगुती गॅस सिलेंडर इतकंच नाहीतर इंधनासाठी संघर्ष करावा लागू शकतो. जगभरातील अनेक देशांतील ऊर्जा संकटाचा परिणाम भारतावरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे पाहता भारताने आतापासून मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 


रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट वाढलं


रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरात कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळशाच्या उपलब्धतेबाबत मोठं संकट निर्माण झालं आहे. यामुळे भारतालाही आता फटका बसण्याची शक्यता आहे. याचा परिणाम येत्या काळात पुन्हा एकदा दिसून येईल. कच्चे तेल आणि इंधनाच्या कमतरतेमुळे भविष्यात भारत कोळशावर अधिक अवलंबून राहण्याची शक्यता आहे.


जगाला ऊर्जेसाठी कोळशाच्या पर्याय 


इतकेच नाही तर रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भारतच नाही तर जगातील अनेक देश आहेत ज्यांनी पुन्हा एकदा कोळशावर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत युक्रेन आणि रशिया युद्ध पूर्णपणे थांबत नाही आणि परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत जगभरातील देशांना कोळशावर अवलंबून राहावं लागू शकतं. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे युरोपमध्ये गॅसचा पुरवठा सातत्याने कमी होत आहे. गॅसच्या कमी पुरवठ्यामुळे युरोपमध्ये ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. युरोपमध्ये गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. रशिया हा युरोपमध्ये गॅस पुरवठा करणारा देश आहे. मात्र रशिया आणि युक्रेन युद्धामुळे इतर देशांच्या


कच्च्या तेलाच्या दरात घसरण


येत्या काळात खाद्यतेल आणि इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 140 डॉलर प्रति डॉलर इतके होते. त्यानंतर मागील तीन-चार महिन्यांपासून कच्च्या तेलाच्यात दर घसरण (Crude Oil Price Falling) झाली आहे. साधारणपणे कच्च्या तेलाच्या दरात मागील तीन महिन्यात 30 डॉलरची घसरण दिसून येत आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती किंचित वाढताना दिसत आहे. याचा परिणाम खाद्यतेल आणि इंधन दरावर होण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या