Operation Spider Ukraine: रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेले युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता युक्रेनने (Ukraine) रशियन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून युक्रेनियन लष्करी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनने सुमारे दीड वर्षांपूर्वी या हल्ल्याची योजना सुरू केली होती. युक्रेनने रशियाच्या (Russia) एअरबेसवर हल्ला केला. "युक्रेनच्या सुरक्षा मोहिमेचे प्रमुख, वासिल मालियुक यांनी आजच्या कारवाईचा अहवाल सादर केला,"हा एक उत्तम निकाल होता. त्याचे नियोजन एक वर्ष, सहा महिने आणि नऊ दिवसांपूर्वी सुरू झाले. अशी माहिती झेलेन्स्की यांनी एक्स वर लिहिलेल्या पोस्ट मधून दिली आहे. (Ukraine Drone Attack in Russia)
रशियाने युद्ध सुरू केले, त्यांचा अंत झालाच पाहिजे- झेलेन्स्की
पुढे बोलताना ते म्हणाले की, "हे आमचे सर्वात लांब पल्ल्याचे ऑपरेशन होते. ऑपरेशनच्या तयारीत सहभागी असलेल्या आमच्या लोकांना रशियन हद्दीतून वेळीच बोलावण्यात आले. युक्रेनच्या या यशाबद्दल जनरल माल्यूक यांचे आभार. मी युक्रेनियन सुरक्षा सेवेला या कारवाईची माहिती जनतेला देण्याचे निर्देश दिले आहेत." सध्या सर्व काही सांगता येणार नाही, पण युक्रेनच्या या कृती इतिहासाच्या पुस्तकात नोंदवल्या जातील. रशियाने युद्ध सुरू केले, रशियाचा अंत झालाच पाहिजे, असेही ते म्हणाले.
युक्रेनने रशियन एअरबेसवर केला हल्ला
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सांगितले की युक्रेनियन ड्रोनने पाच हवाई तळांवर हल्ला केला, ज्यामध्ये अज्ञात विमानांचे नुकसान झाले. यापूर्वी, युक्रेनने रविवारी केलेल्या कारवाईत रशियन तळांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करून सुमारे 40 रशियन विमाने नष्ट केल्याचा दावा केला होता."आज, कीव राजवटीने मुर्मन्स्क, इर्कुत्स्क, इवानोवो, रियाझान आणि अमूर येथील हवाई तळांवर FPV ड्रोन वापरून दहशतवादी हल्ला केला," असे रशियन संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. इवानोवो, रियाझान आणि अमूर येथील लष्करी हवाई तळांवर केलेले सर्व दहशतवादी हल्ले उधळून लावण्यात आले.""मुर्मन्स्क आणि इर्कुत्स्क प्रदेशातील लष्करी हवाई तळांजवळील भागातून सोडण्यात आलेल्या एफपीव्ही ड्रोनमुळे अनेक विमानांना आग लागली. मात्र, आग विझवण्यात आली आहे".असे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
