एक्स्प्लोर

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दहशतवाद्यांसाठी तिजोरी उघडली; मसूदच्या कुटुंबाला 14 कोटी रुपयांची मदत, पुन्हा दहशतवादी छावण्याही उभारणार

या हल्ल्यांमध्ये 11 पाकिस्तानी लष्करी जवान मारले गेले आणि 78 जण जखमी झाले, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

Pakistan: दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा आणखी एक प्रताप उघडकीस आलाय. पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत केलेल्या हल्ल्यात मसूद अजहरच्या जैश ए मोहम्मदचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केलं. आता पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारनं ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट झालेल्या दहशतवादी अड्ड्यांचे पुर्नवसन करण्याची घोषणा केलीय. त्यासोबतच मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई दिली जाईल व जखमींना 10 लाख ते 20 लाख पाकिस्तानी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. (Masood Azhar)

या घोषणेमुळे पाकिस्तानचे वास्तव संपूर्ण जगासमोर आले आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्ताननं आता कोणत्याही थराला जाण्यास सुरुवात केलीय. पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मोठी पोस्ट केली असून दहशतवाद्यांना भरपाई आणि दहशतवाद्यांना लपणाच्या ठिकाणांची पुर्नबांधणी करण्यात आलीय. 6 व 7 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले. ज्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवादी छावण्यांचा समावेश आहे. या दहशतवादी अड्ड्यांमध्ये भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखण्यात आली होती.

मसूद अझहरच्या कुटुंबियांना 14 कोटींची मदत

ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 दहशतवादी मारले गेले आहेत, त्यामुळे पाकिस्तान सरकार त्याच्या कुटुंबाला 14 कोटी रुपये भरपाई म्हणून देणार आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी घरे बांधणे आणि त्यांच्या मुलांची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार ही जबाबदारी पार पाडेल, असे पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणतात. सर्व जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल. शाहबाज शरीफ ज्या लोकांबद्दल बोलत आहेत, ते सर्व दहशतवादी होते, जे भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत होते.

दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट झाल्यानंतर, घाबरलेल्या पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु येथेही त्यांना पराभव पत्करावा लागला. भारताने त्यांच्या हल्ल्यांना अशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले की त्यांनी त्यांच्या संरक्षण यंत्रणा उडवून दिल्या आणि त्यांची ताकद मानणारी क्षेपणास्त्रे नष्ट केली. या हल्ल्यांमध्ये 11 पाकिस्तानी लष्करी जवान मारले गेले आणि 78 जण जखमी झाले, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

प्राण गमावलेल्या पाक लष्कराच्या जवानांना...

शाहबाज शरीफ सरकार प्राण गमावलेल्या पाक लष्कराच्या जवानांना  1ते 1.8 कोटी पाकिस्तानी रुपयांची भरपाई देईल. सैनिकांच्या कुटुंबियांना त्यांच्या पदानुसार ही भरपाई दिली जाईल आणि त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत पूर्ण वेतन आणि निर्वाह भत्ता दिला जाईल. अशी घोषणा केलीय. पाकिस्तान सरकार म्हणते की ते सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलेल आणि प्रत्येक सैनिकाच्या एका मुलीच्या लग्नासाठी 10 लाख पाकिस्तानी रुपये आर्थिक मदत म्हणून देईल. जखमी सैनिकांना 20 ते 50 लाख पाकिस्तानी रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.  ती देखील सैनिकांच्या दर्जाच्या आधारावर दिली जाईल. ज्या सैनिकांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरांसाठी 1.9 ते 4.2 कोटी रुपये दिले जातील.

हेही वाचा:

India China: पाकड्यांनंतर चीनची नको ती चालाखी! अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावे बदलली; भारतानं ही खडसावलं

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
Live Blog Updates: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
Iran War LIve Update: असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
असीम मुनीर अमेरिकेचा सांगावा घेऊन थेट इराणला, पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीची पुन्हा धडपड; गेल्या 24 तासात कलाटणी देणाऱ्या 5 मोठ्या घडामोडी, 21 एप्रिलपूर्वी काय घडणार?
Bita Hemmati: बीता हेमातीबाबत इराणी न्यायाधीशांचा कठोर निर्णय, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुनावली शिक्षा, नेमकं प्रकरण काय?
बीता हेमातीबाबत इराणी न्यायाधीशांचा कठोर निर्णय, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुनावली शिक्षा, नेमकं प्रकरण काय?
US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले
US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajat Patidar: या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
Gautam Gambhir: 'बीसीसीआयमध्ये 'शत्रूंनी' घेरला, निवड समिती सुद्धा विरोधात, त्यांना पदावरून काढून टाकल्यास..' टीम इंडियाच्या गुरुजींबदल इतकं बेधडक नेमकं कोण बोलला?
'बीसीसीआयमध्ये 'शत्रूंनी' घेरला, निवड समिती सुद्धा विरोधात, त्यांना पदावरून काढून टाकल्यास..' टीम इंडियाच्या गुरुजींबदल इतकं बेधडक नेमकं कोण बोलला?
महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ
महिलेसह दोन अधिकाऱ्यास अटक, 50 हजारांची मागितली लाच; एसीबीने सापळा रचून पडकलं रंगेहाथ
Satara News: महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी
महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी
Nashik News: नाशिक धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, रणरणत्या उन्हात रणरागिणींची बाईक रॅली, PHOTO
नाशिक धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, रणरणत्या उन्हात रणरागिणींची बाईक रॅली, PHOTO
आयपीएलमधील 'डोसा-इडली-सांबर-चटणी' गाण्यावरून चेन्नईचा संताप; थेट बीसीसीआयकडे तक्रार, प्रकरण नेमकं काय?
आयपीएलमधील 'डोसा-इडली-सांबर-चटणी' गाण्यावरून चेन्नईचा संताप; थेट बीसीसीआयकडे तक्रार, प्रकरण नेमकं काय?
Embed widget