नवी दिल्ली : भारत-पाक सिमेवर सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकने आपल्या उलट्या बोंबा कायम ठेवल्या आहेत. भारत काश्मीरमधील लोकसंख्येची समीकरणं बदलत असल्याची तक्रार पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाकडे केला आहे.


संयुक्त राष्ट्राला लिहलेल्या एका पत्राद्वारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सरताज अजीज यांनी हा आरोप केला आहे. या पत्रात अजीज यांनी भारत काश्मीरमध्ये सैन्याचे जवान काश्मीरच्या बाहेरच्या व्यक्तींना नागरीक असल्याचं प्रमाणपत्र देत असल्याचं आरोप केला आहे.

तसेच काश्मीरी पंडितांसाठी वेगळं शहर आणि पाकिस्तानच्या पश्चिम भागातून पलायन केलेल्या शरणार्थींना काश्मीरमध्ये वसवत असल्याचा आरोप केला आहे. या सर्व कृतीतून भारत नियमांचं उल्लंघन करत असल्याचा आरोप पाकिस्तानं संयुक्त राष्ट्राकडे केला आहे.