इस्लामाबादः प्रशिक्षण सत्रादरम्यान पाकिस्तानचं एफ-7 हे लढाऊ विमान कोसळून पायलटचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील जमरूड येथे विमान कोसळलं, अशी माहिती पाकिस्तानच्या हवाई दलाने दिली आहे.


विमान कोसळण्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाकडून सध्या या घटनेचा तपास चालू आहे. विमान कोसळलं त्या ठिकाणी कसलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आहे.

पाकिस्तानमध्ये गेल्या 18 महिन्यात सरावादरम्यान अनेक लढाऊ विमान कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मे 2015 मध्ये एका पर्यटन स्थळाची पाहणी करताना पाकिस्तानी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच ऑगस्ट 2015 मध्येही हेलिकॉप्टर कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला होता.