नवी दिल्ली : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षात पाकिस्तानची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पाकिस्तान कधी इराणला पाठिंबा असल्याचा प्रयत्न करते. तर, कधी पाकिस्तानचे सेनाप्रमुख अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतात. पाकिस्तान जरी इराण सोबत असल्याचं सांगत असला तरी इराणच्या सूत्रांनुसार पाकिस्ताननं इराणच्या पाठीत वार केला आहे. इस्त्रायलनं 13 जूनला इराणचे टॉप कमांडर मोहम्मद हुसैन बकरी यांची हत्या केली होती. या प्रकरणी पाकिस्तानी सेनाप्रमुख असमीम मुनीर यांचं नाव समोर आलं आङे इराणच्या टॉप कमांडरचं लोकेशन अमेरिका आणि इस्त्रायलसोबत शेअर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

इराणच्या सूत्रांच्या दाव्यानुसार पाकिस्तान इराण आणि इस्त्रायल संघर्षात डबल गेम खेळत आहे. इराण आणि पश्चिमेकडील देशांसोबत संबंध कायम ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार मोहम्मद हुसैन बकरी यांच्या हत्येपूर्वी मे महिन्याच्या अखेरीस पाकचे सेनाप्रमुख असीम मुनीर यांनी त्यांची भेट घेतली होती, आणि एक स्मार्टवॉच भेट दिलं होतं.   

इराणच्या मीडियाच्या दाव्यानुसार त्या स्मार्टवॉचमध्ये जीपीएस ट्रॅकर होता, ज्यामुळं इस्त्रायलच्या सैन्याला मोहम्मद हुसैन बकरी यांचं लोकेशन मिळालं होतं. ज्यामुळं त्यांच्यावर हल्ला करण्यात इस्त्रायलला यश आलं. १३ जूनच्या हल्ल्यात मोहम्मद हुसैन बकरी आणि त्यांचे दोन सहकारी मारले गेले होते. सूत्रांच्या दाव्यानुसार मोहम्मद हुसैन बकरी यांची भेट घेतल्यानंतर असीम मुनीर यांनी गुप्तपणे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती.  

गेल्या 10 दिवसांपासून इराण आणि इस्त्रायल यांच्यात संघर्ष सुरु आहे. इराणच्या  आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत इराणमध्ये 400हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3500 लोक जखमी झाले आहेत. इराणच्या सैन्याचे टॉप कमांडर आणि अणू शास्त्रज्ञांचा देखील त्यात समावेश आहे. 

इस्त्रायलच्या सैन्यानं 13 जून रोजी इराणवर हल्ला गेला होता. इराणनं अणवस्त्र बनवू नयेत यासाठी हल्ला केल्याचा इस्त्रायलचा दावा आहे. हल्ल्यानंतर इस्त्रायलचे राष्ट्रपती बेंजामिन नेतन्याहू यांनी इराण वेगानं अणवस्त्र निर्मितीवर काम करत असल्याचा दावा केला होता. पुढील तीन वर्षात 10000 बॅलेस्टिक मिसाइल  बनवेल असा दावा केला होता. इस्त्रायलवर इराणनं मिसाईलचा मारा केला तर काय करणार?असा सवाल इस्त्रायलकडून करण्यात येत होता.

दरम्यान,  इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षात अमेरिकेनं एट्री केली आहे. अमेरिकेनं इराणमधील तीन आण्विक तळांवर हल्ले केले होते. यानंतर सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु असा इशारा इराणनं दिला आहे.