Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत-पाकिस्तानदरम्यान दिवसागणिक तनाव वाढत आहे. अशातच या वाढलेल्या तणावाच्या (India Pakistan Tension) पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना उद्या बुधवारी (दि. 07) विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल्स (Mock Drill) राबवण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष माइक जॉन्सन (Mike Johnson) यांनी भारताला एक अतिशय महत्त्वाचा भागीदार म्हणत पाठिंबा दिला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर हे विधान त्यांनी केलंय.
भारत आमच्यासाठी खूप महत्त्वाचा भागीदार
कॅपिटल हिल काँग्रेसला माहिती देताना माइक जॉन्सन म्हणाले की, भारत आमच्यासाठी खूप महत्त्वाचा भागीदार आहे. दहशतवाद्यांच्या विरोधातील या लढाईत पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. माइक जॉन्सन यांनी दिलेल्या विधानामुळे भारत-अमेरिका राजनैतिक संबंधांना नवीन बळकटी मिळतेय. विशेषतः जेव्हा भारत अनेक दशकांपासून सीमापार होणाऱ्या दहशतवादाचा सामना करत आहे. अशा वेळी या लढाईत अमेरिकेचा पाठिंबा महत्वाचा मानला जात आहे.
ट्रम्प प्रशासनाची प्रतिक्रिया, म्हणाले..
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने तातडीने प्रतिसाद दिला आणि भारताला पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार केला. 23 एप्रिल रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर संवाद साधला आणि पीडितांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या. ट्रम्प यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टद्वारे म्हटले आहे की दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत आणि अमेरिका एकत्र उभे आहेत. हा एक भयंकर हल्ला होता आणि त्याच्या गुन्हेगारांना शिक्षा होईल. ट्रम्प प्रशासनाचा हा प्रतिसाद भारताच्या दहशतवादविरोधी धोरणांबद्दलची त्यांची सहानुभूती आणि पाठिंबा दर्शवतो.
व्यापार आणि धोरणात्मक संबंधांची दिशा
माइकन जॉनने आपल्या भाषणात भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संभाषणाचा उल्लेख केला आहे आणि आशा व्यक्त केली की दोन देशातील हे संबंध पुढे ही जपले जाईल. पुढे बोलताना ते गामतीत म्हणाले की, नशीब, मला टॅरिफबद्दल काही प्रश्न कोणी विचारले नाही. त्याचा मला आनंद झाला. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा