एक्स्प्लोर

डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर

यंदाच्या शांतता नोबेल पुरस्कासाठी महिलेला सन्मानित करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई : यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांचे नाव चर्चेत होते. विशेष म्हणजे, त्यांनी स्वत: देखील आपणास शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र, यंदाही डोनाल्ड ट्रम्प हे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मूळ भारतीय वंशाच्या आणि मूळ दक्षिण आफ्रिकेतील नवनेथम 'नवी पिल्लईंना' यंदाचा नोबेल पीस प्राईज (Nobel prize) म्हणजेच शांततेचा नोबेल जाहीर झाला आहे. 

यंदाच्या शांतता नोबेल पुरस्कासाठी महिलेला सन्मानित करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नोबेल समितीतर्फे शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल नवनेथम 'नवी पिल्लईंना' 2026 चा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. यंदाच्या वर्षी 2026 चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याच्या स्पर्धेत पोप लियो, इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट आणि फिलिस्तीनी क्षेत्रातील विशेष रैपोर्टेयर (विशेष प्रतिनिधि) प्रमुख दावेदार होते. यंदाचा 'नोबेल पीस प्राइज' आपल्यालाच मिळायला हवा, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळेच, पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांनी निवड समितीवर आक्षेप घेतला आहे. 

नवी पिल्लेई यांची कारकीर्द-

जन्म: 1941, दक्षिण आफ्रिका.

कायदे क्षेत्रातील सुरुवात: 1967 मध्ये त्या आपल्या प्रांतात वकिली करणाऱ्या पहिल्या महिलांपैकी एक ठरल्या.

वर्णभेदाविरोधातील लढा: दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाच्या काळात त्यांनी वर्णभेदविरोधी कार्यकर्त्यांची बाजू मांडली आणि कैद्यांवरील अत्याचारांचे मुद्दे उपस्थित केले.

रवांडा आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरण: 1995 मध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 1999 ते 2003 या काळात त्यांनी या न्यायाधिकरणाचे अध्यक्षपद भूषवले.

आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय: 2003 मध्ये त्या न्यायाधीश म्हणून निवडल्या गेल्या.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त: 2008 ते 2014 या काळात त्यांनी हे महत्त्वाचे पद सांभाळले.

रसायनशास्त्राचा नोबेल जाहीर संयुक्त बहुमान

जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. यातील रसायनशास्त्र विषयातील नोबेल पुरस्काराची घोषणा बुधवारी करण्यात आली. यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार फ्रान्सचे शास्त्रज्ञ हेन्री बी. कागन आणि जपानचे शास्त्रज्ञ केन्सो सोई यांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे. 'नॉन लिनियर इफेक्ट्स' आणि 'स्व-उत्प्रेरण' या क्षेत्रातील त्यांच्या क्रांतीकारी शोधासाठी रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसकडून हा सर्वोच्च बहुमान देण्यात आला आहे.

हेही वाचा

रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर, हेन्री बी. कागन आणि केन्सो सोई यांना संयुक्त बहुमान

महेश गलांडे हे पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत असून डिजिटल इंडस्ट्रीतील 12 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एकेकाळी गिरणगाव आणि सध्या ज्वारीचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातून ते येतात, श्री भगवतांची बार्शी, म्हणून देखील हे गाव प्रसिद्ध आहे. ग्रामीण महाराष्ट्राची ओळख, शेती-मातीचे प्रश्न त्यांना अवगत आहेत.

याशिवाय, गिरणी कामगार कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने कामगारांचे प्रश्न, मोर्चे, आंदोलन, सामाजिक विषयाची जाण आहे. आपल्या पत्रकारितेच्या कारकि‍र्दीत आत्तापर्यंत 3 लोकसभा आणि 3 विधानसभा निवडणुकांचं कव्हरेज करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे, ग्रामपंचायत ते संसदपर्यंतच्या निवडणुकांचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभवाधारित अभ्यास आहे. 

सोलापूर विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून बार्शी ते मुंबई, व्हाया हैदराबाद असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास राहिला आहे. फॅक्सद्वारे बातमी पाठवणे ते डिजिटलपर्यंतचा बदल अनुभवला. यापूर्वी लोकमतमध्ये त्यांना लोकमत अचिव्हर्स अवॉर्डनेही सन्मानित केलं आहे. ह्युमन इंटरेस्टिंग स्टोरी, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विश्लेषणात्मक बातम्यांची त्यांना चांगली समज आहे.

मीडियातील नाविन्यता, अपडेट्सबद्दल ते जागरुक असतात, AI तंत्रज्ञानाबाबतही ते अपडेट राहतात. सद्यस्थितीत ते एबीपी माझामध्ये डेप्युटी प्रोड्यूसर पदावर कार्यरत असून वेबसाईटवरील बातम्यांसह सोशल मीडियाचंही काम पाहतात.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
पाकिस्तानात पोलिसांच्या पथकावर मोठा दहशतवादी हल्ला, 11 पोलीसांचा जागीच मृत्यू, तर 12 जण जखमी
पाकिस्तानात पोलिसांच्या पथकावर मोठा दहशतवादी हल्ला, 11 पोलीसांचा जागीच मृत्यू, तर 12 जण जखमी
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
लोकांची उंची फक्त तीन फूट, घरांचे दरवाजेही तीनच फूट, जगातील अनोख्या गावचा व्हिडिओ व्हायरल
लोकांची उंची फक्त तीन फूट, घरांचे दरवाजेही तीनच फूट, जगातील अनोख्या गावचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Embed widget