(Source: ECI | ABP NEWS)
Nepal Protest Gen Z मोठी बातमी: सोशल मीडिया बंदीवरुन नेपाळमध्ये राडा, तरुणाई संसदेत घुसली, आतापर्यंत 18 आंदोलकांचा मृत्यू
Nepal Protest Gen Z: नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी आज सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं आहे.

Nepal Protest Gen Z: नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी (Nepal Social Media Ban Gen Z Protest) आज सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. नेपाळच्या काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीये. नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटरसह 26 सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलीये. नेपाळच्या संसद परिसरात जाऊन तरूणांनी आंदोलन केलं. धक्कादायक म्हणजे 18 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.
नेपाळमध्ये हजारो Gen-Z मुले-मुली सरकारच्या रस्त्यावर उतरले (Nepal Protest) आहेत. आज आंदोलकांनी नेपाळच्या संसदेत प्रवेश केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याची फवारणीही केली. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर येत आहे. सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता नेपाळ सरकारने आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे. त्याचवेळी, पोलिसांनी काठमांडूमध्ये रात्री 10 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. काठमांडूमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. नेपाळ पोलिसांच्या मते, 12 हजारांहून अधिक निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी संसदेच्या गेट क्रमांक 1 आणि 2 वर कब्जा केला.
Nepal: Massive Protests break out in Kathmandu over corruption, social media ban; curfew imposed
— ANI Digital (@ani_digital) September 8, 2025
Read @ANI Story | https://t.co/Ges1BQXEKS#Nepal #Protests #Kathmandu #Corruption #SocialMediaBan #Curfew pic.twitter.com/emYM8gDCOn
राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवासस्थानाजवळ सैन्य तैनात- (curfew imposed in nepal)
संसद भवनासोबतच, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाजवळ सैन्य तैनात करण्यात आले आहे. 3 सप्टेंबर रोजी नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. हे प्लॅटफॉर्म नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणीकृत नव्हते. मंत्रालयाने त्यांना 28 ऑगस्टपासून 7 दिवसांची मुदत दिली होती. त्याची अंतिम मुदत 2 सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर नेपाळ सरकारने 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली.
#WATCH | Nepal | Protest turned violent in Kathmandu as people staged a massive protest outside Kathmandu Parliament against the ban on Facebook, Instagram, WhatsApp and other social media sites, leading to clashes between police and protesters. pic.twitter.com/61D5wK3ZTB
— ANI (@ANI) September 8, 2025
नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटरसह 26 सोशल मीडियावर बंदी, संपूर्ण यादी- (Nepal bans 26 social media platforms including Facebook, Twitter)
मेटा प्लॅटफॉर्म: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप.
व्हिडिओ आणि इमेज शेअरिंग: यूट्यूब, स्नॅपचॅट आणि पिंटरेस्ट.
व्यावसायिक नेटवर्किंग: लिंक्डइन.
बातम्या आणि सोशल नेटवर्किंग: एक्स (पूर्वी ट्विटर) आणि रेडिट.
इतर प्लॅटफॉर्म: डिस्कॉर्ड, सिग्नल, थ्रेड्स, वीचॅट, क्वोरा, टम्बलर,
क्लबहाऊस, मास्टोडॉन, रंबल, मीवी, व्हीके, लाइन, इमो, झालो, सोल, बोटिम आणि हॅम्रो पॅट्रो.
मेसेजिंग अॅप्स: ऑनलाइन फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या चिंतेमुळे जुलै 2025 मध्ये टेलिग्रामवर देखील बंदी घालण्यात आली होती.

























