एक्स्प्लोर

Nepal Protest For Social Media Ban: GEN-Z समोर नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचाही राजीनामा, नेमकं काय घडलं?

Nepal Protest For Social Media Ban: नेपाळ सरकारने फेसबुक आणि इंस्टाग्रामसह 26 सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Nepal Protest For Social Media Ban काठमांडू: नेपाळच्या केपी शर्मा ओली सरकारने फेसबुक आणि इंस्टाग्रामसह 26 सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला (Nepal lifts ban on social media) आहे. काल (8 सप्टेंबर) देशभरात तरुणांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर नेपाळ सरकारने (Nepal Protest Gen-Z) सोशल मीडियावरील बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, काल नेपाळमधील GEN-Z आंदोलकांनी संसदेत प्रवेश करत सरकारविरोधात निर्दशने केली होती. यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याची फवारणीही केली. धक्कादायक म्हणजे या आंदोलनातील 20 जणांचा मृत्यू झाला. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा देखील दिला आहे. हिंसक निदर्शनांमध्ये झालेल्या मृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारत रमेश लेखक यांनी राजीनामा दिला.

नेपाळचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी सांगितले की, सोमवारी (8 सप्टेंबर 2025) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सोशल मीडियावरील बंदी उठवण्याच्या निर्णयाबद्दल सरकारला कोणताही पश्चात्ताप नाही, असंही मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी स्पष्ट केले. 

नेमकं प्रकरण काय?

नेपाळ सरकारने एक नवीन बिल संसदेमध्ये आणलं आहे, ज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना स्थानीय प्रतिनिधी नियुक्त करणे, नोंदणी आणि जबाबदारीचे नियम ठेवणे अपेक्षित होतं. 3 सप्टेंबर रोजी नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसह 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. हे प्लॅटफॉर्म नेपाळच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे नोंदणीकृत नव्हते. मंत्रालयाने त्यांना 28 ऑगस्टपासून 7 दिवसांची मुदत दिली होती. त्याची अंतिम मुदत 2 सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर नेपाळ सरकारने 26 सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली. चीनमध्ये आधीपासूनच अमेरिका आणि युरोप प्रायोजित सोशल मीडियावर बंदी आहे. चीनने पाश्चात्य देशांची विचारसरणी रोखण्यासाठी स्वतःचे WeChat, Weibo, Douyin सारखे अॅप्स विकसित केले आहेत. नेपाळमध्येही त्याच धर्तीवर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात येत होता. नेपाळ सरकारने 26 अॅप्सवर बंदी घातली होती. तर दुसरीकडे TikTok, Viber, Nimbuzz इत्यादी चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली नव्हती. 

नेपाळने कोणत्या सोशल मीडियावर घातली होती बंदी?

मेटा प्लॅटफॉर्म: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप.

व्हिडिओ आणि इमेज शेअरिंग: यूट्यूब, स्नॅपचॅट आणि पिंटरेस्ट.

व्यावसायिक नेटवर्किंग: लिंक्डइन.

बातम्या आणि सोशल नेटवर्किंग: एक्स (पूर्वी ट्विटर) आणि रेडिट.

इतर प्लॅटफॉर्म: डिस्कॉर्ड, सिग्नल, थ्रेड्स, वीचॅट, क्वोरा, टम्बलर,

क्लबहाऊस, मास्टोडॉन, रंबल, मीवी, व्हीके, लाइन, इमो, झालो, सोल, बोटिम आणि हॅम्रो पॅट्रो.

मेसेजिंग अॅप्स: ऑनलाइन फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या चिंतेमुळे जुलै 2025 मध्ये टेलिग्रामवर देखील बंदी घालण्यात आली होती.

संबंधित बातमी:

Nepal Protest : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन Gen Z क्रांती? चीनचा वाढता हस्तक्षेप आणि भारताची बारीक नजर; आंदोलनाची A To Z माहिती

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

व्हिडीओ

Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Maharashtra Live blog updates: शासन नियुक्त संचालक पोहचले! सतेज पाटील यांच्या आघाडीचे 13 संचालक अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर, थोड्याच वेळात निवडणूक
Maharashtra Live blog updates: शासन नियुक्त संचालक पोहचले! सतेज पाटील यांच्या आघाडीचे 13 संचालक अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर, थोड्याच वेळात निवडणूक
Embed widget