Mossad Honey Trap Iran: इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद ही जगातील सर्वात धोकादायक आणि अचूकपणे काम करणाऱ्या एजन्सींपैकी एक मानली जाते. तिची कार्यशैली इतकी गुप्त आणि प्रभावी आहे की, अनेकदा तिचे ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत संबंधित देशांनाही याचा सुगावा लागत नाही. 13 जून 2025 पासून सुरू झालेल्या इराणविरोधातील गुप्त मोहिमेतील यश हे त्याचेच उदाहरण आहे. या मोहिमेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते मोसादच्या महिला ब्रिगेडने. अत्यंत देखण्या, आत्मविश्वासपूर्ण आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र हाताळण्याच्या कौशल्याने युक्त या महिला एजंट्सने इराणच्या अणु कार्यक्रमाशी संबंधित 9 वरिष्ठ शास्त्रज्ञ व लष्करी अधिकाऱ्यांना टार्गेट केले. आश्चर्य म्हणजे हे सर्व खून इतक्या गुप्त पद्धतीने झाले की इराणच्या गुप्तचर यंत्रणेलाही सुरुवातीस काहीच आढळले नाही.

हे खून कोणत्या पद्धतीने घडवले गेले याची माहिती समोर येताना, एका नावाने धक्का बसवला– कॅथरीन पेरेझ. फ्रेंच नागरिकत्व असलेली कॅथरीन मोसादच्या एका विशेष मोहिमेसाठी इराणमध्ये आली होती. तिने इस्लाम स्वीकारून स्थानिक शिया समाजात प्रवेश मिळवला. एक वर्षातच ती इराणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबात इतकी खोलवर शिरली की तिच्यावर कोणीही संशय घेतला नाही. तिने ‘हनी ट्रॅप’चा वापर करून या अधिकाऱ्यांपर्यंत माहिती मिळवली आणि गरज पडल्यावर थेट खूनही केले.

हनी ट्रॅप म्हणजे काय?

‘हनी ट्रॅप’ म्हणजे आकर्षण किंवा मोहाचा वापर करून शत्रूच्या जवळ जाणे. मोसादच्या महिला एजंट्स या तंत्राचा वापर करताना अत्यंत व्यावसायिक आणि मर्यादित भूमिका घेतात. २०१२ मध्ये इस्रायली वृत्तपत्र लेडी ग्लोब्स ला दिलेल्या मुलाखतीत मोसादच्या पाच महिला कमांडरनी स्पष्ट केले होते की, “आम्ही मोहकपणे वागतो, परंतु काम पूर्ण करण्यासाठी शरीराचा वापर करत नाही. आम्ही आमच्या मर्यादा ओलांडत नाही.”

मृत शास्त्रज्ञांची यादी

या मोहिमेत खालील 9 महत्त्वाचे इराणी तज्ज्ञ ठार झाले

  • फेरेदुन अब्बासी – अणु अभियांत्रिकी
  • मोहम्मद महदी तेहरानी – भौतिकशास्त्र
  • अकबर मतलाली जादेह – रासायनिक अभियांत्रिकी
  • सईद बेराजी – धातुकर्म
  • अमीर हसन फकाही – भौतिकशास्त्र
  • अब्द अल-हमीद – अणुभट्टी तज्ञ
  • मन्सूर असगरी – भौतिकशास्त्र
  • अहमद रजा दरयानी – अणु अभियांत्रिकी
  • अली बखायी – यांत्रिक अभियांत्रिकी

हे सर्व एकाच पद्धतीने त्यांच्या घरी किंवा विशिष्ट ठिकाणी झोपलेले असताना मारले गेले. यामागे अचूक माहिती, त्यांची दिनचर्या, सुरक्षा व्यवस्था आणि स्थान यावर गहन अभ्यास होता.

मोसादची महिला ब्रिगेड: निवड व प्रशिक्षण

मोसादमध्ये सुमारे 1200 गुप्तहेर काम करतात, यापैकी सुमारे 40 टक्के महिला आहेत. यातील 300 महिला उच्चस्तरीय आहेत. त्यांना अत्यंत कठोर आणि विशेष प्रशिक्षण दिले जाते. मानसिक लवचिकता, गुप्त संवाद, शस्त्र हाताळणे, अभिनय, भाषांचे ज्ञान, आणि इतर अनेक कौशल्ये यासाठी. महिला एजंट्स बहुतेक वेळा अविवाहित असतात कारण मिशनमुळे त्यांना दीर्घकाळ गुप्त ठिकाणी राहावे लागते. त्यांच्या जीवनशैलीत सतत बदल करावे लागतात. वेशभूषा, धर्म, भाषा, आणि वर्तन यामध्ये. ही एजंट्स काही वेळा वर्षानुवर्षे मूळ ओळख विसरून मिशनमध्ये गुंतलेल्या असतात.

इतर महत्वाच्या बातम्या