Whatsapp आपलं लोकप्रिय फिचर लवकरच बंद करणार आहे. हे फिचर कंपनीने मागील वर्षात मार्चमध्ये लाँच केलं होतं. हे अँड्रॅाइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॅामर्सवर आता दिसणार नाही. आता तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मेसेंजर रूम सर्विसच्या फिचरचा वापर करता येणार नाही. हे फिचर 
मागील वर्षीच लाँच केलं होतं. व्हॉट्सव्हॉट्सअ‍ॅप ट्रेकर WABetaInfo च्या अहवालानुसार व्हॉट्सअॅप मेसेंजर रूम शॉर्टकट आता चॅट शेअर वरून लवकरच घालवणार आहेत. अँड्रॅाइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॅामर्सवरून ते घालवणार आहे. कंपनीने हा निर्णय का घेतला? जाणून घ्या.


हे आहे कारण?
WABetaInfo च्या अनुसार व्हॉट्सअॅप वापरकर्ते मेसेंजर रूम फिचरचा जास्त वापर करत नाहीत. त्यामुळेच कंपनीने हे फिचर काढून टाकण्याचानिर्णय घेतला आहे. अहवालानुसार व्हॉट्सव्हॉट्सअ‍ॅप बीटा IOS 2.21.190.11 आणि व्हॉट्सव्हॉट्सअ‍ॅप बीटा अॅंड्रॅाइड 2.21.19.15 या दोन्ही बीटा व्हर्जनवर या फिचरला काढून टाकण्यात आलं आहे. 


मागील वर्षी लाँच
व्हॉट्सव्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर रूम शॉर्टकट हे फिचर कंपनीने मागील वर्षी मे महिन्यात लाँच केलं होतं. या फिचरच्या मदतीने 50 युझर्सचा फेसबूक मेसेंजरमध्ये एक ग्रुप बनवता यायचा. हे फिचर बंद झाल्यानंतर हे फीचर का बंद झाले असेल त्याची अनेक कारणे शोधली गेली होती. आता त्याच पद्धतीचा नवीन फिचर येऊ शकतो अशी चर्चा आहे. 


हे गंमतीशीर फीचर आता येत आहे
Whatsapp एक अशा ग्रुप आयकॉन एडिटरच्या फिचरची टेस्टिंग करत आहे. ज्यात तुम्ही एका स्टिकर किंवा इमोजीला तुमच्या ग्रुप चॅटच्या डिपीमध्ये वापरू शकता. वापरकर्त्यांना बॅकग्राउंड कलरसोबत इमोजी किंवा स्टिकर वापरता येतील. यासाठी दोन पर्याय निवडता येणार आहेत. यातील जे ऑप्शन वापरकर्ते निवडतील ते व्हॉट्सव्हॉट्सअ‍ॅप त्याच्या अनुशंगाने एक ग्रुप इमेज सिलेक्ट करून डीपीसारखे वापरते येणार आहे.