Live Blog Updates: मोठी बातमी! अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Live Blog Updates: डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेला संबोधित करणार आहेत. त्यांनी दावा केला आहे की इराणने युद्धविरामाची विनंती केली आहे. मात्र इराणने हा दावा फेटाळत ट्रम्प खोटे बोलत असल्याचे म्हटलं आहे.

मुकेश चव्हाणLast Updated: 02 Apr 2026 03:46 PM

पार्श्वभूमी

Live Blog Updates: डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेला संबोधित करणार आहेत. त्यांनी दावा केला आहे की इराणने युद्धविरामाची विनंती केली आहे. मात्र इराणने हा दावा फेटाळत ट्रम्प खोटे बोलत असल्याचे म्हटलं...More

हनुमान जयंतीवर अवकाळी पावसाचे सावट

उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात हनुमान जयंतीचा उत्साह आहे, मात्र यावर अवकाळी पावसाचं सावट पहायला मिळतंय. दुपारी आलेल्या पावसानं हनुमान मंदिरात पावसाचं पाणी आल्याने मोठी तारांबळ उडाली आहे. मंदिरा समोर असलेल्या उत्सव मंडपात देखील पाणी साचल्याने भाविकांचा हिरमोड झालाय. दुसरीकडे मावळ तालुक्यात ही पावसाने हजेरी लावलीये. गेल्या दोन-दिवसात पावसाची ये-जा सुरु असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पहायला मिळतंय.

अंजनगाव खेलोबा येथील जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांची समिती

माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना संबंधित जागेची सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सांगितले आहे. त्यानुसार सर्व कागदपत्रे तपासून या जागेची मोजणी व इतर शासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती आमदार अभिजीत पाटील यांनी दिली आहे. 


अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागे संदर्भात आमदार अभिजीत पाटील आणि जिल्हा पोलीस प्रमुख दोन्ही समाजाशी चर्चा करत असताना. आता प्रशासकीय यंत्रणा देखील पुतळ्याच्या जागे संदर्भातील तपासणी करण्यासाठी कार्यमग्न असलेली दिसून येत आहेत.