Lawrence Bishnoi Gang Murdered Sukhdol Singh: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येवरुन कॅनडा (Canada) आणि भारत (India) यांच्यातील तणाव वाढला आहे. अशातच पंजाबमधील फरार गँगस्टर सुखदूल सिंह उर्फ सुक्खा दुनुके याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. अशातच आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, लॉरेन्स बिश्नोई गँगनं (Lawrence Bishnoi Gang) कॅनडातील पिनीपेग सिटीमध्ये भारतातील फरार गँगस्टर सुखदूल सिंह (Sukhdol Singh) उर्फ सुक्खा दुनुकेच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या एका फेसबुक प्रोफाईलवरुन पोस्ट करत कॅनडातील गँगस्टर सुक्खा दुनुकेच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. तुम्ही पाहिजे तिकडे पळून जा, तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा नक्कीच मिळेल, असं म्हणत लॉरेन्स बिश्नोई फेसबुक पोस्टमधून इतर गँगस्टर्सनाही धमकी दिली आहे. 


बिश्नोई गँगनं फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय? 


बिश्नोई गँगनं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "होय, सत् श्री अकाल, राम राम. सुक्खा दुनिकाच्या बंबिहा ग्रुपचा प्रभारी असलेल्या व्यक्तीची कॅनडातील विनिपेग शहरात हत्या करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई ग्रुप त्याची जबाबदारी घेतोय. केवळ व्यसन भागवण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी या नशाबाजानं अनेक घरं उद्ध्वस्त केली होती. आमचे भाऊ गुरलाल ब्रार आणि विकी मिद्दुखेडा यांच्या हत्येमध्येही त्याचा हात होता, त्यानं देशाबाहेर बसून सूत्रं हलवली. त्यानं संदीप नांगल अंबियाचाही खून केला होता, पण आता त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली आहे. फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते की, जे थोडे लोक अजूनही शिल्लक आहेत, ते कुठेही जाऊ देत, जगातल्या कोणत्याही देशात जाऊ शकतात. आमच्याशी शत्रुत्व पत्करुन तुमचा उद्धार होईल, असं समजू नका, कमी-जास्त वेळ लागेल, पण प्रत्येकाला त्यांच्या पापांची शिक्षा होईलच."




दरम्यान, पंजाबमधून पलायन करून कॅनडामध्ये बसलेला A कॅटेगरीचा गँगस्टर सुखदुल सिंह उर्फ ​​सुक्खा दुनुके याची गुरुवारी कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपी सुक्खा हा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंह उर्फ ​​अर्श दलाचा राईट हँड होता आणि एनआयएच्या वॉन्टेड यादीत त्याचा समावेश होता.


अलीकडेच 9 खलिस्तानी दहशतवादी आणि कुख्यात गँगस्टर्सची नावं समोर आली असून त्यात सुक्खाच्या नावाचाही समावेश आहे. जाणून घेऊयात, भारतातील मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत समाविष्ट असलेली इतर काही नावं... 



  • गुरपिंदर सिंह उर्फ बाबा दल्ला 

  • सतवीर सिंह वारिंग उर्फ सॅम

  • स्नोवर ढिल्लन 

  • लखबीर सिंह उर्फ लांडा

  • अर्शदीप सिंह उर्फ अर्श डाला

  • चरणजीत सिंह उर्फ रिंकू बिहला 

  • रमनदीप सिंह उर्फ रमन जज 

  • गगनदीप सिंह उर्फ गगना हठूर


काही महिन्यांपूर्वीच खलिस्तानी दहशतवादी निज्जरची झाली होती हत्या


काही महिन्यांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सरे येथील गुरुद्वाराच्या पार्किंगजवळ दोन मुखवटाधारी बंदूकधाऱ्यांनी निज्जरवर गोळ्या झाडल्या होत्या. त्याच्या हत्येनंतर खलिस्तानी समर्थकांनी कॅनडा, लंडन आणि अमेरिकेसह अनेक ठिकाणी निदर्शनं केली आणि भारतविरोधी घोषणा दिल्या आणि निज्जरच्या हत्येसाठी भारताला जबाबदार धरलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sukha Duneke: कॅनडात भारतातील फरार गँगस्टर सुक्खाची गोळ्या झाडून हत्या; प्रकरण नेमकं काय?