Kim Jong Un: उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी बुधवारी (11 मार्च) एका दारुगोळा निर्मिती कारखान्याला भेट देत शस्त्रनिर्मिती प्रक्रियेची पाहणी केली होती. सरकारी माध्यम Korean Central Television (केआरटी) यांनी जारी केलेल्या दृश्यांमध्ये किम जोंग उन आपल्या मुलगी किम जू ऐ (Kim Ju Ae) हिच्यासह शस्त्र चाचणी करताना दिसून आले. 

Continues below advertisement

कारखान्याच्या भेटीदरम्यान किम जोंग उन यांनी हँडगनमधून सलग गोळीबार करत आपल्या देशाच्या लष्करी ताकदीचे प्रदर्शन केले. तसेच त्यांनी कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया अधिक आधुनिक करण्यावर आणि उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या भेटीदरम्यान किम जोंग उन आणि त्यांची मुलगी जू ए दोघेही काळ्या लेदर जॅकेटमध्ये दिसले. जू ए हिनेही सैन्य अधिकाऱ्यांसोबत शूटिंग ड्रिलमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचे फुटेजमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे किम जोंग उन यांच्या मुलीची वाढती उपस्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे.

Kim Jong Un : शस्त्रनिर्मितीच्या आधुनिकीकरणावर भर

कारखान्याच्या भेटीदरम्यान किम जोंग उन यांनी शस्त्रनिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया बारकाईने पाहिली. त्यांनी सांगितले की हा कारखाना देशाच्या लष्करी शक्ती वाढवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अधिकाऱ्यांनी दूरदृष्टी ठेवून उत्पादन क्षमता वाढवावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही त्यांनी निर्देश दिले.

Continues below advertisement

Kim Jong Un: मुलगी जू ऐचा वाढता सैनिकी सहभाग

अलीकडच्या काळात जू ऐ वारंवार किम जोंग उन यांच्या लष्करी दौऱ्यांमध्ये दिसून येत आहे. या भेटीतही ती आपल्या वडिलांसोबत कारखान्यातील पाहणीदरम्यान उपस्थित होती. प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये जू ऐ सैन्य अधिकाऱ्यांसोबत हँडगनने गोळीबार करताना दिसत आहे.

यापूर्वीही किम जोंग उन यांनी नव्या युद्धनौकेवरून मिसाइल चाचणीचे नेतृत्व करताना जू ऐला सोबत घेतल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे भविष्यात उत्तर कोरियाच्या नेतृत्वात तिची भूमिका काय असेल, याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. एकूणच, किम जोंग उन यांचा हा दौरा केवळ शस्त्रनिर्मितीचा आढावा घेण्यासाठी नसून उत्तर कोरियाच्या वाढत्या लष्करी क्षमतेचे प्रदर्शन आणि भविष्यातील नेतृत्वाबाबत संकेत देणारा मानला जात आहे.

आणखी वाचा 

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या