एक्स्प्लोर

Kim Jong Un Successor : किम जोंग उन यांनी वारसदार निवडला, अवघ्या 13 वर्षांची मुलगी सांभाळणार देशाचा कारभार; कोण होणार उत्तर कोरियाची नवी हुकुमशहा?

Kim Jong Un Successor : उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी आपली अवघी 13 वर्षांची मुलगी किम जू ऐ हिला आपला राजकीय वारसदार म्हणून निवडल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने केला आहे.

Kim Jong Un Successor : उत्तर कोरियातील सत्तासंघर्ष आणि पुढील नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी आपली अवघी 13 वर्षांची मुलगी किम जू ऐ (Kim Ju-ae) हिला आपला राजकीय वारसदार म्हणून निवडल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने केला आहे. दक्षिण कोरियाच्या खासदारांना देण्यात आलेल्या गोपनीय माहितीत हा महत्त्वपूर्ण दावा करण्यात आला.

दक्षिण कोरियाची राष्ट्रीय गुप्तचर संस्था नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस (NIS) यांच्या म्हणण्यानुसार, किम जू ऐ यांची सार्वजनिक आणि अधिकृत कार्यक्रमांमधील उपस्थिती सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अनेक घटकांचा अभ्यास आणि विविध परिस्थितींचे विश्लेषण केल्यानंतरच हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे NIS ने स्पष्ट केले आहे.

Kim Jong Un Successor : वाढती सार्वजनिक उपस्थिती ठरली निर्णायक

NIS च्या अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांत किम जू ऐ अनेक महत्त्वाच्या लष्करी आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये आपल्या वडिलांसोबत दिसून आली आहे. क्षेपणास्त्र चाचण्या, संरक्षणाशी संबंधित कार्यक्रम आणि पक्षीय सोहळ्यांमध्ये तिची प्रमुख उपस्थिती ही केवळ प्रतीकात्मक नसून, तिला भविष्यातील नेतृत्वासाठी तयार केले जात असल्याचे संकेत देणारी असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे मत आहे.

विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यातील बीजिंग दौऱ्यादरम्यान किम जोंग उन यांच्यासोबत किम जू ऐ उपस्थित होती. हा तिचा पहिला परदेश दौरा असल्याची माहिती समोर आली असून, उत्तर कोरियाच्या सत्ताकेंद्रात तिचे स्थान अधिक ठळक होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

Kim Jong Un Successor : किम घराण्याची सत्तापरंपरा पुढे?

उत्तर कोरियामध्ये सत्ता नेहमीच किम कुटुंबातच राहिली आहे. किम इल-सुंग यांच्यानंतर किम जोंग-इल आणि त्यांच्या निधनानंतर किम जोंग उन यांनी सत्ता हाती घेतली. आता हीच वारसाहक्काची परंपरा पुढे नेत, किम जोंग उन आपल्या मुलीला उत्तराधिकारी म्हणून तयार करत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. किम जू ऐ यांच्याबाबत आजवर अत्यंत गोपनीयता पाळली जात होती. मात्र 2022 मध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तपासणीदरम्यान त्या प्रथमच जगासमोर आल्या. तेव्हापासून त्यांच्या सार्वजनिक उपस्थितीत सातत्याने वाढ होत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे.

Kim Jong Un Successor : फेब्रुवारीतील पक्ष परिषद महत्त्वाची

दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस उत्तर कोरियाची महत्त्वपूर्ण पक्ष परिषद (Party Congress) होणार आहे. ही परिषद दर पाच वर्षांनी एकदा आयोजित केली जाते. या परिषदेत किम जू ऐ यांना अधिकृत भूमिका किंवा पद दिले जाते का, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायासह दक्षिण कोरियाची गुप्तचर यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. या परिषदेतून उत्तर कोरियाच्या आगामी पाच वर्षांच्या धोरणांसह आण्विक व संरक्षणात्मक योजनांबाबतही महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.

Kim Jong Un Successor : पक्ष परिषदेतील निर्णयांकडे जगाचे लक्ष

दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणांच्या मते, किम जोंग उन आणि त्यांची पत्नी री सोल जू यांना किम जू ऐ व्यतिरिक्त एक मोठा मुलगा असण्याचीही शक्यता वर्तवली जाते. मात्र या मुलाबाबत आजवर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही किंवा उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी त्याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सध्या तरी किम जू ऐ याच उत्तर कोरियाच्या पुढील सर्वेसर्वा असू शकतात, असे चित्र स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर, उत्तर कोरियाच्या राजकीय भवितव्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्सुकता वाढली असून, किम जोंग उन यांच्या पुढील हालचाली आणि पक्ष परिषदेतील निर्णयांकडे जगाचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Bangladesh Election Results 2026: बांगलादेशमध्ये BNP ची सत्ता येणार, भारतासाठी गुडन्यूज; पंतप्रधान होणारे तारिक रेहमान कोण?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran vs Israel War: नवव्या दिवशीही इराण-इस्रायलचा संघर्ष सुरूच, तेहरानवर भीषण बॉम्बहल्ले, इराणमध्ये आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू; दुबईत मुंबईतील पर्यटक अडकले
नवव्या दिवशीही इराण-इस्रायलचा संघर्ष सुरूच, तेहरानवर भीषण बॉम्बहल्ले, इराणमध्ये आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू; दुबईत मुंबईतील पर्यटक अडकले
Women's Day Wishes 2026 : जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांवर करा शुभेच्छांचा वर्षाव; पाठवा 'हे' हटके मेसेजेस
जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांवर करा शुभेच्छांचा वर्षाव; पाठवा 'हे' हटके मेसेजेस
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup Prize Money: T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
भारत -न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
Embed widget