Israel attack on Iran: इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले चढवत आहेत .अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य कराल तर आमचं सैन्य हल्ला करेल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलाय .दरम्यान इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युद्धबंदीचा म्हणजेच सिझफायरचा प्रस्ताव दिला आहे .
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अलीकडेच परदेशी राजदूतांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं की, इराणचा लष्करी प्रतिसाद पूर्णपणे कायदेशीर आहे .ते म्हणाले आम्ही स्वतःचा बचाव करत आहोत .आमचा बचाव हा कायदेशीर आहे .जर आक्रमकता थांबली तर स्वाभाविकपणे आमचा प्रतिसाद देखील थांबेल .
इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली
इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव आहे .या तणावाचे पडसाद शनिवारी रात्री (14 जून) आणि रविवारी सकाळी ( 15 जून ) दिसून आले .इराणने इस्रायलवर डझनभर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली .त्यापैकी अनेकांनी लष्करी तसेच नागरी क्षेत्रांना लक्ष्य केले होते . यात समोर आलेल्या वृत्तानुसार किमान 10 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता .हा हल्ला इराणचा सर्वात मोठा लष्करी प्रतिसाद मानला जात आहे .
इराण आणि कतार मधील गॅस क्षेत्राला लक्ष्य केल्याचा आरोप इराणचे परराष्ट्रमंत्री अरघची यांनी इस्रायलवर केलाय . या हल्ल्याचे वर्णन इराणने आक्रमक आणि धोकादायक असे केले आहे .ते म्हणाले की संघर्ष पर्शियन आखातात ओढणे ही एक धोरणात्मक चूक आहे .आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की दक्षिण पारस प्रदेश हा जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक आहे .तिथे संघर्ष उफाळला तर जागतिक ऊर्जापुरवठ्याला धोका निर्माण होऊ शकतो .
इस्रायली हल्ला सुनियोजित रणनीती ?
इराणाचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आरोप केलाय की, इस्रायलचा मुख्य उद्देश इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या अणू चर्चा धुडकावून लावणे हा आहे .या रविवारी सहाव्या फेरीच्या चर्चेत एक प्रस्ताव मांडला जाणार होता,जो आता रद्द करण्यात आला आहे. अमेरिकेचे नाव न घेता इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, इस्रायलने केलेला हल्ला पाठिंब्याशिवाय होणारा नाही .जर अमेरिकेला विश्वास हवा असेल तर त्यांनी हल्ल्यांचा निषेध केला पाहिजे .असेही ते म्हणाले .
हेही वाचा