Israel Airstrike LIVE Updates: इस्रायलमध्ये माध्यमांच्या कार्यालयांवरील हल्ल्याचा निषेध

इस्त्रायली सैन्याने ज्या उंच इमारतीवर हवाई हल्ला केलाय, त्यात काही माध्यमांची कार्यालये होती. यात असोसिएटेड प्रेस आणि अल-जझिराच्या नावाचा समावेश आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 May 2021 07:03 AM
इस्रायलमध्ये माध्यमांच्या कार्यालयांवरील हल्ल्याचा निषेध

इस्रायलकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात शनिवारी एक गगनचुंबी इमारत उध्वस्त झाली. ज्यामध्ये असोशिएटेड प्रेस आणि इतर माध्यमांची कार्यालयं होती. असोसिएटेड प्रेसचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी प्रुइट यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, इस्त्रायली सैन्याने गाझामधील एपीच्या ब्युरो आणि अन्य वृत्तसंस्थांच्या इमारतीला लक्ष्य केल्याने त्यांना धक्का बसला.

ही घटना वेदनादायी..

अल जजीरा जेरुसलेमचे बातमीदार हॅरी फॉसेट म्हणाले की, आपल्या सर्वांसाठी हा एक अतिशय वेदनादायी आहे. आता ती जागा राहिली हा विचार करवत नाही.

मीडिया संस्थेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अल जझीराचे रिपोर्टर सफवत अल-कहलौत म्हणाले, की “मी येथे 11 वर्षांपासून कार्यरत आहे. या इमारतीतून मी बर्‍याच घटनांचे वृत्तांकन केलं आहे.. आता डोळ्यासमोर दोन सेकंदात सर्व काही गायब झाले.

पार्श्वभूमी

गाझा : इस्त्रायली हवाई हल्ल्यात गाझा पट्टीवरील एक उंच इमारत उद्ध्वस्त झाली आहे. या इमारतीत असोसिएटेड प्रेस आणि अल-जजीरा सारख्या माध्यमांची कार्यालये होती. एपीच्या म्हणण्यानुसार, इस्त्रायली सैन्याच्या इशार्‍यानंतर त्यांनी ही इमारत रिकामी करण्यास सांगितल्यानंतर हा हवाई हल्ला करण्यात आला.


यापूर्वी शनिवारी पहाटे गाझा शहरात इस्त्रायली हवाई हल्ल्यात कमीतकमी 10 पॅलेस्टाईन ठार झाले. यातील बहुतेक मुले होती. गाझाच्या अतिरेकी हमासच्या राज्यकर्त्यांनी युद्ध सुरू केल्यापासून इस्त्रायली हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांची ही संख्या सर्वाधिक आहे.






याआधी शनिवारी गाझा शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या निर्वासितांच्या छावणीवर इस्त्रायलने हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.


 


इस्रायल-पॅलेस्टाईन वाद भडकला


 पॅलेस्टाईनमधील दहशतवादी गट असलेल्या हमासकडून इस्रायलवर गेल्या पाच-सहा दिवसात हजारो रॉकेट हल्ले करण्यात आले आहेत. त्यामध्ये शेकडो नागरिक जखमी झाल्याचा दावा इस्रायलने केला असून आता हमासला जशास-तसं उत्तर दिलं आहे. इस्रायलनेही गाझा पट्टीवर प्रतिहल्ला करुन हमासच्या 11 कमांडरना मारल्यांचं वृत्त आहे. इस्रायलच्या या हल्ल्यात 70 पॅलेस्टिनी नागरिकांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे आता पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 


 


गेल्या तीन दिवसांपूर्वी जेरुसलेम तीन मोठ्या स्फोटांनी हादरलं होतं. जेरुसलेमच्या वेस्ट वॉलजवळ ज्यू धर्मीय प्रार्थना करत असताना हमासकडून रॉकेट हल्ला करण्यात आला. त्यामध्ये नऊ मुलांसह 20 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी होती. जेरुसलेम मधील अल-अक्सा मशिदीजवळ इस्रायल पोलीस आँणि पॅले्स्टिनी नागरिकांच्यात झटापट झाली होती. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.