Iraq Drone Attack: इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्धासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत युद्धबंदीची (Iran Israel Ceasefire) घोषणा केली आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धानंतर अखेर आता युद्धबंदीची (Iran Israel Ceasefire) घोषणा झालीय. पुढे आलेल्या माहितीनुसार कतार आणि अमेरिकेने या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतलाय. मात्र असे असताना युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर काही मिनिटांतच इराकची राजधानी बगदादमध्ये मोठे स्फोट (Done Attack at Baghdad Military Base) झाल्याचे पुढे आले आहे. इराकी लष्कराच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, इराकी लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बगदादच्या उत्तरेला असलेल्या कॅम्प ताजी नावाच्या लष्करी तळावर एका अज्ञात ड्रोनने हल्ला केला. तसेच स्थानिक वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या ड्रोन हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही पक्षाने स्वीकारलेली नाही. मात्र ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा इराण आणि इस्रायलमध्ये आधीच तणाव आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या पुढाकाराकडे सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जात होते.त्यामुळे या घटनेचे आता नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इराण-इस्रायलमधील युद्धबंदीची डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमधील युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी करार झाल्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी ही माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली. ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देश पुढील 6 तासांत त्यांच्या सध्याच्या लष्करी कारवाया संपवतील. त्यानंतर युद्धबंदी प्रक्रिया सुरू होईल. प्रथम इराण युद्धबंदी लागू करेल, त्यानंतर 12 तासांनंतर इस्रायल देखील त्यात सामील होईल. एकूण 24 तासांनंतर, हा संघर्ष अधिकृतपणे संपल्याचे मानले जाईल.
इराण-इस्रायलकडून युद्धबंदीवर अद्याप शिक्कामोर्तब नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदी बाबत घोषणा केली असली तरी यावर दोन्ही देश नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणे अधिक महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संघर्ष विकोपाला गेला असून या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. शिवाय ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे या प्रदेशात स्थिरतेकडे एक मोठे पाऊल उचलले गेले आहे, जरी दोन्ही देशांनी अद्याप यावर एकमत झालेले नाही.
हे ही वाचा