Iran US War Ceasefire: अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष (Iran US War) अखेर थांबला असून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी (Iran US War Ceasefire) झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज भारतीय वेळेनुसार आज सकाळी पाच वाजल्यानंतर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा आणि इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. मात्र दिलेल्या अल्टिमेटम पूर्वीच इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत अल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. (Iran US War Ceasefire)

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यात चीन आणि पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचं बोललं जात आहे. तसेच इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेकडे एक सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे. जो आता अमेरिकन बाजू वाटाघाटीसाठी पुढे करणार आहेत. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली असून 10 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरु होईल. (Iran US War Ceasefire)

इराणने कोणत्या 10 अटी घातल्या? (Iran US War Ceasefire)

  1. अहिंसेप्रती कटिबद्धता
  2. होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार
  3. युरेनियम संवर्धनास परवानगी
  4. सर्व प्राथमिक निर्बंधांची समाप्ती
  5. सर्व दुय्यम निर्बंधांची समाप्ती
  6. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
  7. गव्हर्नर्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
  8. इराणला नुकसानभरपाई देणं
  9. पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याची माघार
  10. लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ काय म्हणाले? (Pakistan Iran US War Ceasefire)

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करत म्हणाले की, अत्यंत विनम्रतेने, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण' आणि 'युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका' तसेच त्यांचे सहयोगी देश यांनी लेबनॉनसह इतर सर्वत्र तातडीने युद्धविराम करण्याबाबत सहमती दर्शविली आहे. आणि हा युद्धविराम त्वरित अंमलात येईल. मी या सुज्ञ निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच, सर्व वाद मिटवून एका निश्चित करारापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने पुढील चर्चा करण्यासाठी, मी त्यांच्या शिष्टमंडळांना शुक्रवार, 10 एप्रिल 2026 रोजी इस्लामाबादला भेट देण्याचे निमंत्रण देतो, असं शाहबाज शरीफ पोस्ट करत म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प काय काय म्हणाले? (Iran US War Ceasefire)

ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, मी दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि हल्ले थांबवण्यास सहमत आहे. हा द्विपक्षीय युद्धविराम असेल. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार, मी आज रात्री इराणकडे पाठवण्यात येणारी विनाशकारी लष्करी शक्ती थांबवत आहे, परंतु अट अशी आहे की इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे उघडण्यास सहमती दर्शवावी. हे करण्यामागचे कारण असे आहे की, आम्ही सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केली आहेत आणि त्याहूनही पुढे गेलो आहोत, आणि आम्ही इराणसोबत दीर्घकालीन शांततेसाठी आणि मध्य-पूर्वेतील शांततेसाठी एका ठोस कराराच्या अगदी जवळ आहोत. मला इराणकडून 10-कलमी प्रस्ताव मिळाला आहे, आणि आमचा विश्वास आहे की वाटाघाटींसाठी हा एक व्यवहार्य आधार आहे. अमेरिका आणि इराण जवळपास सर्व पूर्वीच्या विवादांवर सहमत झाले आहेत, परंतु कराराला अंतिम रूप देण्यासाठी आणि तो पूर्ण करण्यासाठी हा दोन आठवड्यांचा कालावधी आवश्यक आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून आणि मध्य-पूर्वेतील राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करत असताना, या दीर्घकाळ चाललेल्या समस्येवर तोडगा काढण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणे हा माझा सन्मान आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. 

संबंधित बातमी:

Iran US War Ceasefire मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा