Iran US War Ceasefire: इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची (Seyed Abbas Araghchi) यांनीही एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल मुनीर (Asim Munir) यांचे आभार मानले. ते म्हणाले की, दोन्ही नेत्यांनी या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

अराघची (Seyed Abbas Araghchi) यांनी असेही सांगितले की, पाकिस्तानी पंतप्रधानांनी बंधुत्वाचा संदेश दिला होता. याला प्रतिसाद म्हणून आणि अमेरिकेच्या चर्चेच्या प्रस्तावाला प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेने 15-कलमी प्रस्ताव सादर केला होता, तर इराणने 10-कलमी आराखडा सादर केला होता. अमेरिकेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे की, ते वाटाघाटींचा आधार म्हणून इराणचा प्रस्ताव स्वीकारतील.

Iran US War Ceasefire: इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून संदेश

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की, जर इराणवरील हल्ले पूर्णपणे थांबले, तर इराणचे सशस्त्र दल देखील त्यांच्या बचावात्मक कारवाया थांबवतील. याचा अर्थ असा की शांतता राखण्याची समान जबाबदारी दोन्ही बाजूंवर असेल. परिषदेने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तोम्हणजे पुढील दोन आठवड्यांत, इराणी लष्कराच्या समन्वयाने आणि तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीची खात्री केली जाईल. हा प्रदेश जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण येथून मोठ्या प्रमाणात तेलाची वाहतूक होते.

Iran US War Update : युद्धविरामाचा अर्थ काय?

इराण-अमेरिका युद्धविरामाचा अर्थ असा आहे की दोन्ही बाजूंकडून होणारे हल्ले काही काळासाठी थांबवले जातील. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण राहिली आहे. हा युद्धविराम एक द्विपक्षीय करार आहे, दोन्ही बाजूंच्या संमतीने उचललेले एक पाऊल आहे. आशा आहे की यामुळे पुढील चर्चेचा मार्ग मोकळा होईल आणि परिस्थिती शांत होईल.

हे सुद्धा वाचा: