Iran Russia : भाषणबाजीचा उपयोग होणार नाही, खुलेपणानं साथ द्या, इराणच्या खामेनींचं व्लादीमीर पुतिन यांना पत्र
Iran Russia Relations: रशियानं इराणच्या मुद्यावर थेट अमेरिकेसोबत पंगा घेण्यामध्ये रस दाखवलेला नाही. पुतिन यांनी अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा शब्द दिला आहे.

Iran Russia Relations:इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती. रशियानं अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळावंर हल्ला केल्याच्या घटनेचा निषेध केला. रशियानं इराणच्या शिष्टमंडळाला सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे. अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले केल्यानंतर झालेली ही भेट महत्त्वाची आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचं पत्र घेऊन विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी रशियाच्या अध्यक्षांची भेट घेतली.
खामेनी यांचं पुतिन यांना पत्र
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी विदेशी मंत्री अब्बास अराघची यांच्या मार्फत पुतिन यांना एक पत्र पाठवलं आहे. यामध्ये रशियाकडून खुलं समर्थन मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.रशियाकडून ज्याप्रकारे पाठिंबा दिला जातोय तो इराणला आवडलेला नाही. खामेनी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं की पुतिन यांनी इस्त्रायल आणि अमेरिकेविरोधात खुलेपणानं समोर यावं आणि पाठिंबा द्यावा. मात्र, इराणला रशियाकडून कशा प्रकारची अपेक्षा आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
थेट संघर्षापासून रशिया दूर
रशिया इराणचा जूना मित्र आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत रशियानं त्यांच्या वेटोचा वापर करुन इराणच्या पाश्चिमात्य देशांसोबतच्या अणवस्त्र चर्चांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यात गेल्या चार वर्षापासून युद्ध सुरु आहे. रशियानं इराण आणि अमेरिकेच्या वादात थेट उडी घेण्यामध्ये अजूनपर्यंत रस दाखवला नाही. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले आहेत तेव्हापासून त्यांनी अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले आहेत.
इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांची भेट
पुतीन यांनी वारंवार अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. रिपोर्टनुसार ज्याप्रकारे अमेरिकेनं यूक्रेनला पाठिंबा दिला आहे,त्या प्रमाणं रशियानं इराणला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा आहे. इराणचे विदेश मंत्री अघारची यांनी भेट घेतल्यानंतर व्लादीमीर पुतिन यांनी म्हटलं की इराणच्या विरोधातील कारवाईला कोणत्याही प्रकारचा आधार आणि कसलंही औचित्य नाही. इराणसोबत आमचे दीर्घकाळ मैत्रीपूर्ण आणि विश्वासाचे संबंध आहेत. आम्ही आमच्याकडून इराणच्या लोकांना समर्थन देण्याचा प्रयत्न करत आहोत, अंसं पुतिन म्हणाले.
रशियाचे अध्येक्ष पुतिन आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांच्या या वर्षाच्या सुरुवातीला एक करार झाला होता. ज्यामध्ये सुरक्षा सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली होती.



















