Israel Iran war: इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदीवर काम करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 शिखर परिषदेतून काढता पाय घेतल्याचा फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूअर मॅक्रॉन यांचा दावा फेटाळून लावलाय. इजराइल आणि इराण मधील युद्धबंदीवर काम करण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी जी 7 शिखर परिषदेतून लवकर निघून गेल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी म्हटले होते .त्यांच्या वक्तव्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत पोहोचल्या पोहोचल्या प्रतिक्रीया दिली आहे.

"प्रसिद्धी मिळवण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी चुकून असे म्हटल्याचं ट्रॅम्प म्हणालेत. मी आता वॉशिंग्टनला का जात आहे हे त्यांना माहित नाही, परंतु त्याचा युद्धबंदीशी निश्चितच काहीही संबंध नाही. त्याहूनही मोठं काहीतरी आहे. मुद्दाम असो वा नसो, इमॅन्युएल नेहमीच चूक ठरतात. पाहत रहा" असे अमेरिकेचे अध्यक्ष त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हणाले.

इमॅन्यूअल नेहमीच चुकीचे ठरतात: ट्रम्प

कॅनडामधील G7 शिखर परिषदेतून लवकर निघून जाण्याबाबत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वक्तव्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प म्हणाले की मॅक्रॉन "नेहमीच चुकीचे ठरतात" आणि वॉशिंग्टनमध्ये परतण्यामागील कारण इस्रायल आणि इराणमधील संभाव्य युद्धबंदी करार होता हे नाकारले.  युद्धबंदी हे G7 शिखर परिषदेतून लवकर निघून जाण्याचे कारण नव्हते. "यापेक्षा खूप मोठे काहीतरी आहे," असे त्यांनी अधिक तपशील न देता ट्रम्प यांनी सांगितल्यानं त्यांच्या वक्तव्याची सध्या मोठी चर्चा आहे.

ट्रुथ सोशलवर बोलताना ट्रम्प यांनी लिहिले: “प्रसिद्धी मिळवणारे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी चुकून म्हटले आहे की मी कॅनडामधील G7 शिखर परिषदेतून निघून इस्रायल आणि इराणमधील 'युद्धविराम'वर काम करण्यासाठी डीसीला परतलो. चुकीचे! मी आता वॉशिंग्टनला का जात आहे हे त्यांना माहित नाही, परंतु त्याचा युद्धविरामाशी निश्चितच काहीही संबंध नाही. त्याहूनही मोठं घडतंय. जाणूनबुजून असो वा नसो, इमॅन्युएल नेहमीच चूकीचे ठरतात.' अशी पोस्ट ट्रम्प यांनी केलीय. 

आज सकाळीच व्हाईट हाऊसने घोषणा केली होती की ट्रम्प G7 शिखर परिषदेतून एक दिवस लवकर निघून वॉशिंग्टनला परततील. मध्य पूर्वेतील वाढत्या संकटाला तोंड देण्यासाठी हे कारण सांगण्यात आले. या घोषणेनंतर लगेचच, मॅक्रॉन यांनी आपली टिप्पणी केली आणि म्हटले की ट्रम्प यांनी आपला दौरा आखडता करण्याचा निर्णय हा इस्रायल आणि इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले?

ते म्हणाले, खरंतर  युद्धबंदीसाठी आणि नंतर व्यापक संवाद सुरू करण्यासाठी  बैठक आणि संवाद प्रस्तावित करण्यात आला आहे . आता दोन्ही बाजू यावर पुढे जातात की नाही हे पाहणे बाकी आहे 'सध्या मला वाटते की हा संवाद पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता आहे .नागरिकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे " फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी पुढे सांगितले,परिस्थितीत तात्काळ बदल होण्याची त्यांना अपेक्षा नाही परंतु अमेरिकेने आश्वासन दिले आहे की ते युद्धबंदीचा मार्ग शोधतील . इस्रायलवर दबाव आणण्याची  क्षमता त्यांच्याकडे आहे .त्यामुळे परिस्थिती बदलू शकते "

हेही वाचा:

Iran Israel War: अभेद्य असल्याचा गवगवा असणाऱ्या इस्रायलच्या तोरा इराणने उतरवला, आयर्न डोम भेदून क्षेपणास्त्रं आत कशी शिरली?