Iran Israel War : इराणसोबत युद्ध करणे हे अमेरिकेच्या आर्थिक नुकसानीचे ठरत आहे. कारण अमेरिकेच्या खर्चात झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेने या युद्धावर आधीच अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. इराणच्या 'कॉस्ट टिकर'ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, हल्ल्यांपासून अमेरिकेने 35 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. यापैकी, अंदाजे 11.3 अब्ज डॉलर्स केवळ सहा दिवसांत खर्च झाले आहेत. दररोज 1 अब्ज डॉलर्स खर्च होत आहे, म्हणजेच प्रत्येक सेकंदाला हजारो डॉलर्स खर्च होत आहेत.
लष्करी मालमत्तेचे नुकसान, आतापर्यंत अंदाजे 2.9 अब्ज डॉलर्स
अमेरिकेच्या लष्करी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. 'वॉल स्ट्रीट जर्नल'नुसार, गेल्या तीन आठवड्यांतील नुकसान आणि दुरुस्तीचा खर्च 1.4 अब्ज ते 2.9 अब्ज डॉलर्सच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे. खरे तर, इराणने आपल्या कमी किमतीच्या लढाऊ ड्रोनद्वारे अमेरिकेच्या पायाभूत सुविधांवर हल्ला केला आहे. चुकीने आपल्याच सैन्यावर झालेल्या हल्ल्यात 100 दशलक्ष डॉलर्स किमतीची लढाऊ विमाने नष्ट झाली आहेत.
याव्यतिरिक्त, प्रत्येकी 100 दशलक्ष डॉलर्स किमतीची तीन अमेरिकन F-15E लढाऊ विमाने चुकून आपल्याच सैन्यावर झालेल्या हल्ल्यात नष्ट झाली. 80 दशलक्ष डॉलर्सहून अधिक किमतीच्या एका एफ-35 ए विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले. आणखी एका केसी-135 टँकरची हवेतच प्राणघातक टक्कर झाली.
30 दशलक्ष डॉलर्स किमतीचे ड्रोनही नष्ट
30 दशलक्ष डॉलर्स किमतीचे डझनहून अधिक एमक्यू-9 रीपर ड्रोनही नष्ट झाले आहे. लाखो डॉलर्स किमतीच्या अनेक रडार आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींचेही नुकसान झाले. जीवितहानीच्या बाबतीत, 13 अमेरिकी सैनिक ठार झाले आणि 200 जखमी झाले आहेत. 28 फेब्रुवारीपासून सुरू असलेले हे युद्ध संपण्याची शक्यता धूसर दिसत आहे. परिणामी, जागतिक ऊर्जा बाजारात गोंधळ स्पष्टपणे दिसून येत आहे.
राणच्या प्रतिहल्ल्यात अमेरिकेचे 22 फायटर जेट्स उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच, मध्य पूर्व आशियातील अमेरिकेचे सुमारे 13 लष्करी तळ आता राहण्यायोग्य राहिलेले नाहीत, असाही अहवाल समोर आला आहे. मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेने आपल्या सैनिकांची संख्या वाढवून 50000 पर्यंत नेली आहे, जे सामान्य स्थितीपेक्षा १०,००ोंनी जास्त आहे. यामुळे लष्करी खर्चात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणि मालवाहतूक विस्कळीत झाल्याने अमेरिकन कंपन्यांना आणि व्यापाराला मोठा फटका बसला आहे.या युद्धाचा परिणाम केवळ अमेरिकेवरच नाही, तर जागतिक स्तरावर इंधन आणि खाद्यतेलाच्या वाढत्या किमतींच्या स्वरूपात सर्वसामान्यांच्या खिशावरही होत आहे.