Iran Israel War: अमेरिकेने 3 आण्विक तळं उडवली, इराणमधून येऊ शकते विषारी हवा, भारतातील 'या' राज्यांवर होणार परिणाम
Iran Israel War: अमेरिकेने इराणमधील तीन आण्विक तळं उद्धवस्त केल्यानंतर याचा सर्वात जास्त परिणाम भारत आणि पाकिस्तानवर होणार आहे.

Iran Israel War: इराण आणि इस्रायल (Iran Israel War) यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेत युद्धाचे ढग दाटले असतानाच अमेरिकेने या युद्धात उडी घेतली होती. 21 जून रोजी अमेरिकेच्या अत्याधुनिक बी 2 स्टील्थ बॉम्बर्स विमानांनी इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन प्रमुख आण्विक तळांवर हल्ला केला.
अमेरिकेच्या इराणवरील या हल्ल्यानंतर रशिया, चीन, पाकिस्तानने युद्धबंदीची मागणी केली आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे प्रकरणाला गंभीर वळण आलं असून संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटारेस यांनी चिंता देखील व्यक्त केली आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील तीन आण्विक तळं उद्धवस्त केल्यानंतर याचा सर्वात जास्त परिणाम भारत आणि पाकिस्तानवर होणार आहे.
अणुस्थळांवर हल्ला झाल्यामुळे किरणोत्सर्गी कचरा बाहेर पडणार-
मध्य आशियातून येणारे वारे, जे संपूर्ण भारतीय उपखंडावर परिणाम करतात. इराणच्या अणुस्थळांवर हल्ला झाल्यामुळे किरणोत्सर्गी कचरा देखील बाहेर पडेल. हा कचरा वाऱ्यासोबत पाकिस्तान आणि भारतासह संपूर्ण आशियात पसरू शकतो. खरंतर, भारत पश्चिमेकडील वाऱ्यांच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याचे परिणाम भारतासाठी खूप वाईट असू शकतात. हे फक्त इराणचे संकट नाही, तर आपलेही संकट आहे. हा किरणोत्सर्गी कचरा वाऱ्यासोबत इतर देशांमध्येही पसरू शकतो.
इराणवर झालेल्या आण्विक तळांवरील हल्ल्याचा परिणाम भारतातील कोणत्या राज्यावर होणार?
पंजाब आणि हरियाणा: पंजाब आणि हरियाणा ही राज्ये इराणच्या जवळ आहेत. येथे भरपूर धान्य उत्पादन होते. जर येथे किरणोत्सर्गी कचरा पसरला तर रब्बी पीक नष्ट होऊ शकते आणि देशात धान्याची कमतरता निर्माण होऊ शकते.
दिल्ली-एनसीआर: दिल्लीतील हवा आधीच खराब आहे. जर इराणमधील किरणोत्सर्गी कचरा येथे आला तर तो खूप धोकादायक ठरू शकतो.
राजस्थान: राजस्थानमध्ये किरणोत्सर्गी धूळ जमिनीत जाऊ शकते आणि ती अनेक वर्षे गाडून माती विषारी बनवू शकते.
उत्तर प्रदेश आणि बिहार: उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये किरणोत्सर्गी कचरा पसरल्यास पिण्याचे पाणी आणि भाताचे पीक खराब होऊ शकते.
हिमालय: हिमालयात किरणोत्सर्गी कचरा पसरल्यास तो हिमनद्या आणि बर्फ दूषित करू शकतो. यामुळे भारतातील पवित्र नद्या किरणोत्सर्गी होऊ शकतात.
किरणोत्सर्गी कचरा (Radioactive Waste) म्हणजे काय?
किरणोत्सर्गी कचरा म्हणजे असा कचरा ज्यामध्ये किरणोत्सर्गी सामग्री (radioactive material) असते आणि ज्याचा पुन्हा वापर करणे शक्य नसते. हा कचरा वायू, द्रव किंवा घन स्वरूपात असू शकतो. अणुऊर्जा प्रकल्प, वैद्यकीय उपचार, संशोधन आणि औद्योगिक प्रक्रिया यांसारख्या विविध स्रोतांकडून हा कचरा निर्माण होतो.




















