Israel Iran US War : संपूर्ण जगाचीचिंतावाढणवणारीएकबातमीसमोरआलीआहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धासंदर्भात (Israel vs Iran War) एकअतिशयमोठीआणि महत्तवाची अपडेट समोर आली. अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणेचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei) यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलाय. तरदुसरीकडे शनिवारी (28 फेब्रुवारी 2026) इस्रायल आणि अमेरिकेने इराणी राष्ट्रपती भवनासह अनेक ठिकाणी हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांमधील, तेल अवीवमधील आणि इस्रायलमधील इतर ठिकाणी असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये इराणमध्ये सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाल्याचीमाहितीआहे. ज्यात 85 शाळकरी मुलींचाही समावेश आहे. (Iran Supreme Leader Ali Khamenei Death News)
दरम्यान, इस्रायली हल्ल्यात इराणचे संरक्षण मंत्री अमीर नासिरजादेह आणि अनेक आयआरजीसी कमांडर मारले गेल्याचे दावेही केले जात आहेत. इस्रायलने म्हटले आहे की, इराणी राजवट उलथवून टाकण्याच्या उद्देशाने केलेल्या या कारवाईची तारीख काही आठवडे आधीच निश्चित करण्यात आली होती.
Iran Israel War Update : इराणमध्ये 200 हून अधिक मृत्यू
इराणी माध्यमांनुसार, अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यात 201 इराणी मारले गेले आणि 747 जखमी झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन उद्दिष्टे सांगितली: पहिले, इराणी नौदल नष्ट करणे, दुसरे, इराणचा क्षेपणास्त्र उद्योग नष्ट करणे आणि तिसरे, इराण अण्वस्त्रे मिळवू शकत नाही याची खात्री करणे. ट्रम्प यांनी अमेरिकन लोकांच्या संभाव्य जीवितहानीबद्दल इशाराही दिला. किंबहुना, इराणी अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रत्युत्तर विनाशकारी असेल. इस्रायल आणि अमेरिकेने इराणमधील तेहरान, तब्रिझ, केरमानशाह, कोम, कारज आणि इस्फहानवर हल्ला केला. हल्ल्यानंतर तेहरानवरील आकाशात धुराचे लोट पसरले.
Iran on US : इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला
या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारमधील अल उदेद हवाई तळ, कुवेतमधील अल सलेम तळ, युएईमधील अल धफ्रा हवाई तळ, बहरीनमधील अमेरिकेचा पाचवा फ्लीट तळ, सौदीची राजधानी रियाध आणि इस्रायली शहर हैफा आणि गॅलीलमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रे डागली. फ्रान्स, जर्मनी आणि युनायटेड किंग्डमने एक संयुक्त निवेदन जारी करून मागणी केली की, "इराणने आपला अणुकार्यक्रम सोडून द्यावा आणि त्याचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवावा. आपल्या देशांना अस्थिर करणाऱ्या कारवाया टाळाव्यात. इराणने स्वतःच्या लोकांविरुद्ध करत असलेला भयानक हिंसाचार आणि दडपशाही थांबवावी."
फ्रान्स, जर्मनी आणि युनायटेड किंग्डमने संयुक्त निवेदन केले जारी (France, Germany and the United Kingdom)
फ्रान्स, जर्मनी आणि युनायटेड किंग्डमने स्पष्ट केले की ते हल्ल्यात सहभागी नव्हते, परंतु अमेरिका, इस्रायल आणि इतर देशांच्या संपर्कात आहेत. निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही इराणने या प्रदेशातील देशांवर केलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो. इराणने अंदाधुंद लष्करी हल्ले टाळावेत. आम्ही संवाद पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करतो आणि इराणी नेतृत्वाला वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन करतो. शेवटी, इराणी लोकांना त्यांचे भविष्य स्वतः ठरवण्याची परवानगी दिली पाहिजे."
संबंधित बातमी:
